Kesar Mango : केसर आंब्याला प्लॅटफॉर्म मिळवून देणार

State Board of Agricultural Marketing : मराठवाडा व महाराष्ट्रातील केसर आंब्याला देश आणि जागतिक स्तरावर प्लॅटफॉर्म मिळवून देण्यासाठी पणन मंडळाचे प्रयत्न सुरू, असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे संचालक संजय कदम यांनी केले.
Inauguration of Mango and Millet Festival
Inauguration of Mango and Millet FestivalAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : कोकणातल्या हापूस प्रमाणेच मराठवाडा व महाराष्ट्रातील केसर आंब्याला देश आणि जागतिक स्तरावर प्लॅटफॉर्म मिळवून देण्यासाठी पणन मंडळाचे प्रयत्न सुरू, असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे संचालक संजय कदम यांनी केले.

छत्रपती संभाजीनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता २३) आंबा व मिलेट महोत्सवाचे उद्‍घाटन विधानसभेचे माजी अध्यक्ष व आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. कदम बोलत होते. या कार्यक्रमाला बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे, उपसभापती मुरलीधर चौधरी यांच्यासह संचालक, श्रीराम शेळके, जगन्नाथ काळे व इतर संचालक,

Inauguration of Mango and Millet Festival
Kesar Mango : मराठवाड्याच्या ‘केसर’ची अपेक्षेप्रमाणे आवक नाहीच

जिल्हा उपनिबंधक डॉ. मुकेश बारहाते, पणनचे विभागीय उपसरव्यवस्थापक जे. सी. वाघ, पणन मंडळाचे सल्लागार देविदास पालोदकर, महाकेसर आंबा बागायतदार संघाचे अध्यक्ष नंदलाल काळे, तज्ञ संचालक उपाध्यक्ष डॉ. भगवानराव कापसे, महापालिकेच्या नगररचना विभागाचे विश्‍वनाथ दहे, दामूअण्णा नवपुते आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

प्रास्ताविक बाजार समितीचे सभापती श्री. पठाडे यांनी केले. श्री. कदम म्हणाले, की पुण्यात भरणारा आंबा महोत्सव प्रत्येक विभाग स्तरावर घेण्याची भूमिका पणनमंत्र्यांनी घेतली. त्याला अनुसरून राज्यात विविध ठिकाणी आत्ताच्या घडीला आंबा महोत्सव सुरू आहेत. अलीकडेच नागपुरात केसर, हापूस आंबा महोत्सवाच्या माध्यमातून विक्रीसाठी ठेवला. जवळपास ४० लाखांचा हापूस आंबा त्या महोत्सवातून विकला गेला.

Inauguration of Mango and Millet Festival
Mango Orchard : आंबा बागायतदारांना पावसाचा फटका

पुढच्या वर्षी नियोजनपूर्वक गट तयार करून आंबा फुलोऱ्यात असल्यापासूनच महोत्सव नेमका कधी घ्यायचा याविषयी नियोजन केले जाईल. पणन मंडळाने जवळपास २० वर्षांपासून हापूसला निर्यातीत स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. तसेच प्रयत्न यापुढे मराठवाड्याच्या, महाराष्ट्राच्या केसरला स्थान मिळवून देण्यासाठी केले जातील.

याशिवाय महोत्सवात सहभागी होणाऱ्या आंबा उत्पादकांना क्रेट देण्यावरही विचार सुरू आहे. अध्यक्षीय समारोप करताना श्री. बागडे म्हणाले, की आंबा उत्पादकांनी आपल्या पिकाकडे व्यवसाय म्हणून पहावे. त्यानुसारच बागांची निगा राखावी. उत्पादनाबरोबर दर्जा सांभाळावा व ग्रेडिंग करूनच आंब्याची विक्री करावी.

आभार संचालक श्रीराम शेळके यांनी मानले. आंबा महोत्सवात सुरुवातीला जवळपास १४ ते १५ हापूस व केसर आंबा उत्पादक सहभागी झाले. याशिवाय प्रक्रियायुक्त मिलेट पदार्थ ही विक्रीसाठी काही स्टॉलमधून उपलब्ध करून देण्यात आले होते. हापूसची ४०० ते ७०० रुपयांपर्यंत प्रति डझनाने विक्री सुरू होती. तर केसर आंबा १०० ते १७० रुपये प्रति किलो दरम्यान विकण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com