Mango Orchard : आंबा बागायतदारांना पावसाचा फटका

Mango Growers : वेगवान वाऱ्यामुळे फळांची गळ; घरे, गोठ्यांची पडझड. विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसाने आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे.
Mango Orchard
Mango OrchardAgrowon

Mango Crop Damage : सलग दुसऱ्या दिवशी पूर्वमोसमी पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसाने आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. वेगवान वाऱ्यामुळे झाडावरील आंबा गळून गेला आहे. यंदा शेवटच्या टप्प्यात चांगले उत्पादन मिळेल, अशी बागायतदारांना होती. कॅनिंगचा दरही समाधानकारक असल्यामुळे बागायतदार खूष होते.

पण पूर्वमोसमी पावसाने त्यांचा घात केला असून बाजारातील आंब्यांचे दर घसरले आहेत.
संगमेश्‍वर, रत्नागिरी, खेड, चिपळून, लांजा, राजापूरमध्ये रविवारी (ता. १९) सायंकाळी आणि मध्यरात्री जोरदार पाऊस झाला. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. या पावसाचा सर्वाधिक फटका मुंबई-गोवा आणि नागपूर-कोल्हापूर महामार्ग चौपदरीकरणातील कामाला बसला आहे.

अचानक पडलेल्या पावसाने सगळीकडेच चिखल झाला होता. मागील आठवड्यात खेड, दापोली, चिपळूण तालुक्यांना पावसाने झोडपले. वादळी वाऱ्यामुळे घरा, गोठ्यांसह आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. रत्नागिरी शहर परिसर वगळता जयगड, करबुडे परिसरात पावसाची हजेरी लागली होती.

Mango Orchard
Avkali Paus : आंबा बागायतदारांना वादळी पावसाचा फटका

शनिवारी रात्री हलका पाऊस झाला. झाडावरील आंबे काढण्याची लगबग सुरू असतानाच पावसाने खोडा घातला. झाडावरील संपूर्ण आंबे गळून पडले असून अनेक ठिकाणीही आंब्याची झाडेही उन्मळून पडली आहेत.

खाडीपट्ट्यातील आंबा बागायतदार व माजी सरपंच अकबर दुदुके यांच्या आंबा बागायतीचीही मोठी हानी झाली. आंब्याची झाडे कोसळून आंबेही गळून पडले आहेत. यामुळे लाखो रुपयांचा फटका बसला आहे. प्रशासनाने ही बाब गांभिर्याने घेऊन तातडीने पंचनामे करत नुकसान भरपाई देण्याची मागणी आंबा बागायतदार दुदुके यांनी केली आहे.

केळी, पपईची बाग उद्ध्वस्त
खेड तालुक्यातील वेरळ येथील केळी, पपईची २५ ते ३० एकर बाग उद्ध्वस्त झाली आहे. प्रगतिशील शेतकरी सदानंद कदम यांच्या केळीच्या आणि पपईच्या बागांना देखील फटका बसला आहे. हजारो पपईची आणि केळीची झाडे मोडून चिखलात पडली आहेत. शेतकरी कदम यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याचे पंचनामे कृषी विभागाकडून करण्यात येणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com