Crop Insurance : पीकविमा प्रस्तावासाठी 'ऑफलाईन'चा पर्याय ठेवा

परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा मिळावा. अनेकदा शेतकरी अर्ज भरताना त्याला तांत्रिक अडचणी येतात. त्यामध्ये ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित होतो आणि नंतर अर्ज भरण्याची कालमर्यादा संपते
Crop Insurance
Crop Insurance Agrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा मिळावा. अनेकदा शेतकरी अर्ज भरताना त्याला तांत्रिक अडचणी येतात. त्यामध्ये ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित होतो आणि नंतर अर्ज भरण्याची कालमर्यादा संपते. याबाबत काही अडचणी असल्यास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी खासदारांशी चर्चा करायला हवी.

केंद्र शासनासोबत बोलून अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करू. पीक विमा प्रस्ताव ऑनलाइन भरताना त्याला ऑफलाईन प्रस्ताव भरण्याचा पर्याय ठेवावा अशी सूचना जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा खासदार संजय जाधव (MP Sanjay Jadhav) यांनी केली.

Crop Insurance
Crop Insurance : तेरा हजारांवर शेतकऱ्यांना विमा परतावे नाही

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हा विकास,समन्वय व संनियंत्रण समितीची (दिशा) आढावा बैठक समितीचे अध्यक्ष खासदार संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाली.समितीच्या सहअध्यक्षा तथा खासदार फौजिया खान,सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी आंचल गोयल, सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्पसंचालक रश्मी खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोन्सीकर, उपस्थित होते.

खासदार जाधव म्हणाले, की ग्रामीण भागातील नागरिकांना नळजोडणी देवून त्याद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन ही महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेतील सर्व कामे गुणवत्तापूर्ण होतील याची खबरदारी घ्या.

यापूर्वी १६ गावांची एकत्रित पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी अडचण आली होती. त्याच धर्तीवर पुन्हा चार गावांची पाणीपुरवठा योजना एकत्रित सुरु न करता स्वतंत्र करावी. खासदार खान यांनी जिल्ह्यात वृक्षारोपण करणे आणि लावलेली झाडे वाचवून वनाच्छादन वाढविण्याच्या सूचना केल्या.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com