KDCC District Bank : ‘केडीसीसी’चा उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरव

केंद्र सरकारच्या आयकर खात्याकडून कोल्हापूर विभागातील नॉन कॉर्पोरेट विभागात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे.
KDCC Bank
KDCC BankAgrowon

Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (Kolhapur District Central Cooperative Bank) अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत मराठा समाजाच्या हजारो तरुणांना रोजगार, उद्योग व व्यवसाय उभारणीसाठी कर्ज पुरवठा केला आहे.

बँकेच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महामंडळाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील (MLA Narendra Patil) यांच्या हस्ते बँकेला सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील महाराणी ताराराणी सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत बँकेचा हा सन्मान करण्यात आला. बँकेच्या वतीने व्यक्तिगत कर्ज विभागाचे व्यवस्थापक एस. के. बावधनकर व रघुनाथ जांभळे या अधिकाऱ्यांनी हा सन्मान स्वीकारला.

KDCC Bank
Sangli DCC Bank : सांगली जिल्हा बँक चौकशीचा गोंधळ सुरूच

२०२२-२३ या आर्थिक वर्षाअखेरपर्यत केडीसीसी बँकेने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत एकूण १,२७८ जणांना ११९ कोटींचा वित्तपुरवठा केलेला आहे.

बँकेने चालू पीक हंगामात फेब्रुवारी २०२३ या महिना अखेरपर्यंत एकूण १,६०० कोटी रुपयांचा कर्जपुरवठा केलेला आहे. त्यामध्ये खरीप हंगामासाठीचे उद्दिष्ट इष्टांकापेक्षा ११५ टक्के जास्त आहे.

या पद्धतीने शेतीसह ग्रामीण भागाशी निगडित सर्वच कर्जपुरवठ्यांमध्ये इष्टांकाची पूर्तता नेहमीच इतर बँकांपेक्षा जास्त करून या बँकेने जिल्ह्याला सबंध राज्यामध्ये अग्रेसर ठेवले आहे.

तसेच केंद्र सरकारच्या आयकर खात्याकडून कोल्हापूर विभागातील नॉन कॉर्पोरेट विभागात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे.

KDCC Bank
Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’मुक्‍त होण्याच्या मार्गावर गोंदिया जिल्हा

त्याशिवाय जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांना बँकेमार्फत अनेक सेवा सुविधा दिल्या जातात. या सभासद संस्थांना दहा टक्के लाभांश दिला जातो. बँक लवकरच ९,००० कोटी रुपये ठेवींचे उद्दिष्ट व २०० कोटी रुपये नफ्याचे उद्दिष्ट साध्य करणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com