
Karad News : जून मध्यावर आला तरीही पावसाचा पत्ताच नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरवर्षी मॉन्सूनच्या पावसापूर्वी होणाऱ्या वळीवाच्या पावसावर आत्तापर्यंत सुमारे २५ ते ३० टक्के पेरण्या पूर्ण होतात. यंदा मात्र पावसाने पूर्णतःच ओढ दिल्याने सातारा जिल्ह्यातील शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत.
सातारा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे सातारा जिल्हा हा खरिपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात दरवर्षी सोयाबीन, बाजरी, भात, भुईमूग, मका, ज्वारी, मूग, नाचणी, तूर, उडीद, इतर कडधान्य आणि उसासह अन्य पालेभाज्या, भाजीपाल्याची पिके खरिपात मोठ्या प्रमाणात घेतली जातात.
त्याद्वारे शेतकऱ्यांना चार चांगले पैसेही मिळतात. हवामान खात्याने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज दिला होता. त्यामुळे यंदा खरिपातील पिके चांगली येतील
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी वळिवाचा दमदार पाऊस होतो. त्यावर शेतकरी पेरणीपूर्व मशागती उरकून अधूनमधून पडणाऱ्या वळीवाच्या पावसावर जमिनीतील ओल बघून पेरण्याही करून घेतात.
त्यातून दरवर्षी १५ जूनपर्यंत सुमारे २५ ते ३० टक्के पेरण्या उरकलेल्या असतात. अजूनही काही दिवस पाऊस न आल्यास पेरण्या लांबून रब्बीतील पिकांनाही त्याचा फटका बसण्याची शक्यता शेतकऱ्यांतून वर्तवली जात आहे.
खरीप हंगामातील प्रस्तावीत पेरणीची आकडेवारी
पिकाचे नाव पेरणीची आकडेवारी
सोयाबीन - ८८ हजार ८०० हेक्टर
बाजरी - ६० हजार ७०० हेक्टर
भात - ४७ हजार ७३९ हेक्टर
भुईमूग- ३१ हजार ७०० हेक्टर
मका - २१ हजार २०० हेक्टर
ज्वारी - १२ हजार हेक्टर
मूग - १२ हजार हेक्टर
नाचणी- पाच हजार ६०० हेक्टर
तूर - एक हजार हेक्टर
उडीद - पाच हजार हेक्टर
इतर- कडधान्य ४४ हजार ६०० हेक्टर
ऊस - एक लाख ७ हजार हेक्टर
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.