Kharif Sowing In Satara : खरीपपूर्व मशागतीची कामे अंतिम टप्यात

Kharif Sowing : सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरण्यासाठीच्या शेतीच्या मशागती अंतिम टप्प्यात आल्या आहेत.
Kharif Sowing In Satara
Kharif Sowing In SataraAgrowon

Satara News : सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरण्यासाठीच्या शेतीच्या मशागती अंतिम टप्प्यात आल्या आहेत. मात्र पुरेसा पाऊस नसल्याने पेरणीच्या कामांना सुरुवात करता येत नाही. दरम्यान, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून खरिपातील धूळवाफ पेरण्यांना, तर काही ठिकाणी भाताच्या रोपासाच्या नर्सरीसाठी बी टाकण्यास सुरुवात झाली आहे.

सातारा जिल्ह्याचे खरिपाचे एकूण सरासरी क्षेत्र तीन लाख ३२ हजार हेक्टर एवढे आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्याला एक लाख १५ हजार टन रासायनिक खतांची मागणी असून, त्यापैकी एक एप्रिल ३४ हजार ५५० टन युरियाचा पुरवठा झालेला आहे.

तसेच मागील आठवड्यात १४ हजार ५०० टन युरिया उपलब्ध झाला असून, त्याचा पाटण, महाबळेश्‍वर, जावळी तालुक्यांत पुरवठा करण्यात आला आहे. तसेच ४७ हजार ३३१ हजार क्विंटल बियाण्याची गरज आहे.

त्यापैकी जिल्ह्यात ३० हजार ३०१ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. यामध्ये भात ८८०९ क्विंटल, बाजरी ५६० क्विंटल, ज्वारी ३७४ क्विंटल, सोयबीन १३ हजार ६९९ क्विंटल, भुईमूग ३१ क्विंटल, मका ३७६२ क्विंटल उपलब्ध झाले आहे.

दरम्यान, खरिपात रासायनिक खते व बियाणांची जाणीवपूर्वक कृत्रिम टंचाई निर्माण करून त्याची जास्त दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर करवाई करण्यासाठी १२ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

Kharif Sowing In Satara
Kharif Sowing : पावसाच्या दडीमुळे खरीप पेरण्या खोळंबल्या

या भरारी पथकाकडून सहा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यातील ११ पैकी सातारा, कऱ्हाड, पाटण, जावळी, महाबळेश्‍वर, वाई, हे पाच तालुके खरीप तालुके म्हणून ओळखले जातात.

या तालुक्यांत खरिपातील सर्वाधिक पेरण्या होतात. काही ठिकाणी वादळी पाऊस झाल्याने येथील मशागतीची कामे उरकली आहेत. तर काही ठिकाणी कसलाच पाऊस नसल्याने येथील मशागतीची कामे रखडली आहेत.

उफळ्याची शेती असणाऱ्या शेतकऱ्यांकडून धूळवाफ पेरणीची कामे सुरू केली आहेत. तसेच भात लागवडीसाठी आवश्यक असणाऱ्या रोपांसाठी बी टाकण्यास सुरुवात केली आहे.

प्रमुख खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

भात - ४७ हजार

बाजरी -६० हजार

ज्वारी - १७ हजार

मका - २१ हजार

सोयाबीन - ८८ हजार

भुईमूग - ३७ हजार

Kharif Sowing In Satara
Kharif Sowing : जळगाव जिल्ह्यात मृग नक्षत्रात खरिपाचा पेरा हुकला

प्रमुख पिकांच्या बियाणांची मागणी (क्विंटलमध्ये)

भात - ११ हजार ४००

बाजरी - १ हजार ७४६

ज्वारी - १ हजार ७००

सोयाबीन - १४ हजार ६६०

मका - ९ हजार ५४०

भुईमूग - १ हजार ५००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com