Farmer Relief : कळमना बाजारात १०० किलो काट पद्धती रद्द; संत्रा बागायतदारांना दिलासा

Kalmana Market Update : कळमना बाजार समितीत संत्रा, मोसंबी खरेदीत प्रतिटनामागे १०० किलो अतिरिक्‍त काट म्हणून घेतला जातो. या व्यवहारात संत्रा बागायतदारांचे नुकसान होत असल्याने ही पद्धती बंद करण्याचा निर्णय पणन मंडळ संचालक, व्यापारी व आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
Marketing Board Meeting
Marketing Board MeetingAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : कळमना बाजार समितीत संत्रा, मोसंबी खरेदीत प्रतिटनामागे १०० किलो अतिरिक्‍त काट म्हणून घेतला जातो. या व्यवहारात संत्रा बागायतदारांचे नुकसान होत असल्याने ही पद्धती बंद करण्याचा निर्णय पणन मंडळ संचालक, व्यापारी व आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

कळमना बाजार समितीत हंगामात सुमारे वीस लाख टनांपेक्षा अधिक संत्रा-मोसंबीची आवक होते. या शेतकऱ्यांकडून प्रतिटनामागे १०० किलो अतिरिक्‍त फळे काट म्हणून घेतली जातात. संत्रा बागायतदार चांगल्या फळांच्या जोडीला ढिगामध्ये कमी प्रतीच्या फळांची सरमिसळ करतात. यातून नुकसान होत असल्याचे कारण देत ही व्यापाऱ्यांकडून ही लूट होत होती.

Marketing Board Meeting
Jawari Mirchi Price : जवारी मिरचीला उच्चांकी दर

मुंबईत यापूर्वी झालेल्या बैठकीत देखील ही अन्यायकारक पद्धत बंद करण्याची सूचना करण्यात आली होती. पणन मंडळाने बाजार समिती सचिवांशी थेट संवाद साधत ही पद्धत बंद करण्याबाबत आवश्‍यक ती कार्यवाही करण्याची सूचना केली होती. पणन मंडळाच्या सूचनेनंतर बाजार समिती प्रशासनाने ठोस पावले न उचलता केवळ बाजार समिती परिसरात काट पद्धत बंद असल्याबाबतचा फलक लावून याबाबतची औपचारिकता पूर्ण केली.

Marketing Board Meeting
Egg Price : ओमानची निर्यात प्रभावित झाल्याने अंडीदर दबावात

काट पद्धत मात्र नेहमीसारखीच सुरू होती. याबाबत माहिती मिळताच आमदार ॲड. अशिष देशमुख यांनी पणन संचालक विकास रसाळ, महाऑरेंजचे मनोज जवंजाळ यांच्यासह बाजार समितीत धडक दिली. या वेळी चर्चेसाठी बाजार समिती प्रशासनासह व्यापाऱ्यांनाही आमंत्रित करण्यात आले. सचिव येगलेवार, ओमप्रकाश मैनानी, महंमद इनाम, महंमद इर्शाद, ॲड. प्रकाश टेकाडे, अशोक धोटे, महादेव नखाते, अंगद भैस्वार, प्रदीप पुतेरीया, सुधाकर ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेअंती काट पद्धत हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आमदार आशिष देशमुख यांनी कळमना बाजारातील काट पद्धत बंद करण्यासाठी पणन संचालकांच्या उपस्थितीत व्यापारी व बाजार प्रशासनाचे अधिकारी यांची बैठक घेतली. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत लूट थांबणार आहे.
मनोज जवंजाळ, संचालक, महाऑरेंज

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com