Jowar Crop : हुरड्यासाठीची ज्वारी बहरात

Jowar Variety : गंगापूर तालुक्यातील सारंगपूर व नरसापुर हे हुरडयासाठीच्या ज्वारीचे मुख्य केंद्र आहेत. सुरती, गुळभेंडी हे दोन वाण शेतकरी प्राधान्याने लागवडीसाठी घेतात.
Jowar
JowarAgrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, पैठण व खुलताबाद आदी तालुक्यांत कमी अधिक प्रमाणात सुमारे १२०० ते १५०० हेक्टर दरम्यान हुरड्यासाठीच्या ज्वारीची लागवड झाली आहे. आजवर पोषक स्थिती असल्याने ही ज्वारी चांगलीच बहरात आहे. दुसरीकडे हुरडा पार्ट्यांनाही विविध भागांत जोर पकडला आहे.

गंगापूर तालुक्यातील सारंगपूर व नरसापुर हे हुरडयासाठीच्या ज्वारीचे मुख्य केंद्र आहेत. सुरती, गुळभेंडी हे दोन वाण शेतकरी प्राधान्याने लागवडीसाठी घेतात. हुरड्यासाठी प्रीमॅच्युअर काढणी होते व ओलावा जास्त असल्याने जास्त काळ साठवता येत नाही. कृषी विभाग व आत्मच्या माध्यमातून हुरडा उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन हुरड्याचे अधिक काळासाठी संवर्धन करता येईल का? याविषयी प्रयत्न झाले.

Jowar
Jowar Farming : पोषक वातावरणामुळे हुरड्यासाठीची ज्वारी बहरात

परंतु त्यामध्ये फारसे यश आले नसल्याने शेतकरी पारंपरिक पद्धतीने हुरडा तयार करून त्याची विक्री करण्याची तंत्र अवलंबत आहेत. साधारण गोकुळाष्टमी (ऑगस्ट दुसरा पंधरवडा) ते ऑक्टोबरपर्यंत हुरड्याच्या ज्वारी पेरली जाते. काही शेतकऱ्यांनी तर अलीकडे नोव्हेंबरमध्येही हुरड्यासाठीच्या ज्वारीची पेरणी केली. सध्याची पीक परिस्थिती एकदम चांगली आहे. सध्या टप्प्याटप्प्याने हुरड्याची काढणी आणि विक्री सुरू झाली आहे.

दीपावलीनंतर हंगामाला सुरुवात झाली. एका एकरला सरासरी ५०० ते ६०० किलो हुरडा उत्पादन होते. सद्यःस्थितीत हुरड्याला ३५० रुपये प्रति किलोचा दर मिळतो आहे. सरासरी दर दीडशे रुपये जरी पकडला तरी एकरी ७० ते ७५ हजार रुपये उत्पन्न मिळत. त्यासाठी १५ ते २० हजार एकरी खर्च होतात असं उत्पादक शेतकरी सांगतात. यंदा शेतकऱ्यांनी हुरडा ज्वारीच्या लागवडीचे केलेले टप्पे लक्षात घेता.

Jowar
Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

यंदा हंगाम फेब्रुवारी किंवा मार्चपर्यंत चालेल असा अंदाज आहे. सामान्यतः सारंगपूर, नरसापूर शिवारातील हुरड्याला अमरावती, नागपूर, चंद्रपूर, अकोला, सोलापूर, पंढरपूर, फलटण, अकलूज, बार्शी, जालना, नाशिक, शिर्डी, शिरूर, पुणे आदी ठिकाणांवरून मोठी मागणी असल्याची माहिती हुरडासाठी लागणाऱ्या ज्वारीचे उत्पादक तसेच हुरडा डेपो चालवणारे शेतकरी अण्णासाहेब शिंदे यांनी दिली.

हुरडा ज्वारी ही आर्थिकदृष्ट्या अत्यंत फायदेशीर ठरते आहे. खर्चाच्या तुलनेत चांगले उत्पन्न शेतकऱ्यांना मिळते. शिवाय जनावरांसाठी चारा उपलब्ध होतो.
- प्रकाश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, छत्रपती संभाजीनगर
या वर्षीचा हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू झाला. हुरडा मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. हुरड्यासाठी पोषक असणारी थंडी पडलेली असल्यामुळे हंगाम शेतकऱ्यांसाठी चांगला आणि जास्त काळ चालेल. तसेच यावर्षी शेतकऱ्यांना दर सुद्धा चांगला मिळण्याची शक्यता आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
- दिलीप मोटे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मा, गंगापूर
सुमारे ४० एकरावर यंदा हुरड्यासाठीच्या ज्वारीची ५ ऑगस्ट ते २५ नोव्हेंबर दरम्यान पाच टप्प्यांत लागवड केली. सारंगपूर, नरसापूर परिसरातील २०० ते २५० शेतकरी हुरड्यासाठी लागणाऱ्या ज्वारीचे उत्पादन घेतात. आपण स्वतः हुरडा डेपो चालवून विविध जिल्ह्यांत हुरड्याची विक्री करतो दररोज १००० ते १२०० किलो हुरडा आमच्या परिसरातून जातो.
- अण्णासाहेब शिंदे, उत्पादक व विक्रेते, सारंगपूर-नरसापूर, ता. गंगापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com