Land Record : सोलापूर जिल्ह्यातील ४२८१ सातबारे झाले जिवंत

Jivant Satbara Drive : या मोहिमेत जिल्ह्यातील ४ हजार २८१ सातबाऱ्यांवरील मयतांची नावे कमी करून त्यांच्या वारसांची नावे घेण्यात आली आहेत.
Land Record
Land Record Agrowon
Published on
Updated on

Solapur News : सातबाऱ्यावर असलेली मयताची नावे कमी करून वारसांची नोंद करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रशासकीय नेतृत्वाखाली जिल्ह्यात जिवंत सातबारा मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत जिल्ह्यातील ४ हजार २८१ सातबाऱ्यांवरील मयतांची नावे कमी करून त्यांच्या वारसांची नावे घेण्यात आली आहेत.

या मोहिमेत सर्वाधिक चांगली कामगिरी सांगोला तालुक्याने केली आहे. या तालुक्यातील ९९४ सातबाऱ्यावर मयतांच्या वारसांची नोंद घेण्यात आली आहे. त्या खालोखाल मंगळवेढा तालुक्यात ५६८, करमाळा तालुक्यात ४१७, पंढरपूर तालुक्यात ३७६ सातबाऱ्यावर अशा नोंदी घेण्यात आल्या आहेत.

Land Record
Land Record: समजून घ्या गाव नमुना

यामध्ये जिल्ह्यात ८ हजार ४३६ मयत खातेदार आढळून आले होते. सातबाऱ्यावरील मयतांची नावे कमी करून वारसांची नावे लावण्याबाबत ४ हजार ८०३ जणांना पहिल्या टप्प्यात लाभ देण्याचे ठरले. वारस नोंदीसाठी जिल्ह्यातून एकूण ४ हजार ५९४ प्रस्ताव दाखल झाले होते.

त्यापैकी ४ हजार २८१ प्रकरणात वारस नोंदीसाठी मंजुरी देण्यात आली आहे. सध्या ३०६ प्रकरणे प्रलंबित असून त्यामध्ये माळशिरस तालुक्यातील सर्वाधिक १२१, पंढरपूर तालुक्यातील ४१, मंगळवेढा तालुक्यातील ३१ प्रकरणे प्रलंबित आहेत. मंद्रूप अपर तहसील, करमाळा व सांगोला तहसीलकडे एकही प्रकरण प्रलंबित नाही.

Land Record
7/12 Land Records: सातबारा उताऱ्यावरील नोंदींसाठी नवीन नियंत्रण कक्ष; आता एकही अर्ज प्रलंबित राहणार नाही

दुष्टेक्षेप...

जिल्ह्यात एकूण मृत खातेदार आढळले - ८,४३६

पहिल्या टप्प्यात लाभार्थी ठरवले - ४,८०३

प्रस्ताव दाखल - ४,५९४

मंजूर प्रकरणे - ४,२८१

नामंजूर प्रकरणे - ७

प्रलंबित प्रकरणे - ३०६

तालुकानिहाय

सातबाऱ्यांची नोंद

तालुका नोंद झालेली सातबारे

सांगोला ९९४

मंगळवेढा ५६८

करमाळा ४१७

पंढरपूर ३७६

प्रलंबित प्रकरणे

तालुक प्रलंबित प्रकरणे

माळशिरस १२१

पंढरपूर ४१

मंगळवेढा ३१

प्रकरण प्रलंबित नसलेले तालुके

मंद्रूप अपर तहसील, करमाळा, सांगोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com