Jayant Patil
Jayant PatilAgrowon

Jayant Patil : ‘शासन आपल्या दारी’, खर्च सर्वसामान्यांच्या माथ्यावरी' जयंत पाटील यांची टीका

Shasan Aplya Dari : राज्य शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ या कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी (जि. बीड) येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी मंडपाचा खर्च २ कोटी २१ लाख, तर अन्य खर्च लाखोंच्या घरात येणार आहे. यावरून ‘शासन आपल्या दारी आणि खर्च सर्वसामान्यांच्या माथ्यावरी’ असाच प्रकार दिसून येत आहे,’’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी (ता. १३) केली.
Published on

NCP Crisis : ‘‘राज्य शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ या कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी (जि. बीड) येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी मंडपाचा खर्च २ कोटी २१ लाख, तर अन्य खर्च लाखोंच्या घरात येणार आहे. यावरून ‘शासन आपल्या दारी आणि खर्च सर्वसामान्यांच्या माथ्यावरी’ असाच प्रकार दिसून येत आहे,’’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी (ता. १३) केली.

Jayant Patil
NCP Crisis : शरद पवार गटाकडून ४० आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका

राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात घेण्यात येत आहे. या उपक्रमाच्या खर्चाची मर्यादा तीन कोटींवर नेण्यात आली आहे. या उपक्रमावरून विरोधी पक्ष टीका करीत आहेत. आता खर्चमर्यादा वाढविल्याने या कार्यक्रमाचे फलित काय असा सवाल केला जात आहे.

दोन दिवसांपूर्वी पाचोरा येथे हा कार्यक्रम झाल्यानंतर आता बीड येथील परळीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या नियोजित कार्यक्रमाच्या मंडपासाठी २ कोटी २१ लाख ९० हजार ८५० रुपयांची निविदा मागविण्यात आली आहे. मुख्य मंडपासाठी ८१ लाख ९४ हजार १०० रुपयांची, साइड मंडपासाठी ६० लाख १४ हजार, १४० रुपयांची, तर इलेक्ट्रिक कामांसाठी ७९ लाख ८२ हजार ५१० रुपयांची निविदा मागविली आहे, असे पाटील यांनी नमूद केले.

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदार संघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा झाली. या सभेला देखील भव्य मंडप उभारला होता. आता ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमासाठी देखील तोडीसतोड मंडप उभारण्याचे नियोजन आहे. मात्र याचा खर्च करदात्यांच्या खिशातून केला जाणार आहे, अशी टीका पाटील यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com