Beetroot Foods : बिटापासून जॅम, जेली, बिस्किटे

Beetroot Processing Foods : बिटाचे औषधी गुणधर्म लक्षात घेता यापासून खाद्यपदार्थ निर्मितीला चांगली संधी आहे. भरपूर पोषण तत्त्व असलेल्या या कंदमुळाचा आहारात केवळ सॅलड म्हणून वापर मर्यादित असल्याचे दिसून येते. बिटापासून विविध पदार्थांची निर्मिती करता येते.
Beetroot Processing Foods
Beetroot Processing FoodsAgrowon
Published on
Updated on

Beetroot Processing :

जॅम

बीट स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे. त्यानंतर साल काढून बारीक तुकडे करावेत. तुकडे मिक्सरमधून बारीक करून घ्यावेत. नंतर एका पातेल्यात १ किलो साखर आणि १ किलो बीटचा गर शिजविण्यास ठेवावा.

सर्व घटकपदार्थ एकत्र मिसळून मिश्रण ठराविक घट्टपणा ६८.५ डिग्री ब्रिक्स येईपर्यंत शिजवावे. शिजवताना मिश्रण पळीने हलवावे. ४ ग्रॅम सायट्रिक आम्ल टाकावे. तसेच मिश्रण सारखे ढवळत राहावे,

बीटरूट जॅम गरम गरम असतानाच निर्जंतुक केलेल्या काचेच्या बरणीत भरावे. नंतर पॅरिफिन वॅक्सने सील करावे. बाटल्या थंड व कोरड्या वातावरणात साठवाव्यात.

जेली

साल काढून किसून घ्यावे. किसलेल्या बीटच्या वजनाच्या दीडपट पाणी घेऊन ते उकळत ठेवावे. या उकळत्या पाण्यात किसलेले बीट टाकून १५ ते २० मिनिटे उकळून गाळून घ्यावे. १५० मिलि किसलेल्या बीटामध्ये ६० ग्रॅम साखर, ०.६ ग्रॅम सायट्रिक अॅसिड मिसळून उकळावे.

२ ग्रॅम पेक्टिन मिसळून सतत ढवळत ठेवून, त्या मिश्रणाचा टी.एस.एस. हा ६५ अंश ब्रिक्स आला, की मिश्रण उकळणे थांबवावे. या मिश्रणाला जेलीच्या साच्यात ओतून साचे ३० ते ४० मिनिटे किमान स्थिर ठेवावे. तयार बीटरूट जेली साच्यातून काढून पॅक करून साठवून ठेवावी.

Beetroot Processing Foods
Ginger Food Processing : आल्यापासून पावडर, मुरंबा, कॅण्डी

केक

मैदा हा आरोग्याला फारसा फायदेशीर नसल्याने जर त्यात बिटचा वापर केला तर केकचे पोषणमूल्ये वाढवता येऊ शकते. सर्वप्रथम १०० ग्रॅम मैदा आणि ४ ग्रॅम बेकिंग पावडर एकत्र करून ३ ते ४ वेळा चाळून घ्यावे.

दुसऱ्या भांड्यात ३० ग्रॅम वनस्पती तूप आणि ८० ग्रॅम साखर एकत्र करावी. यामध्ये मैदा, बेकिंग पावडर आणि ४० ग्रॅम बिट गर एकत्र करून हे मिश्रण केक पात्रात भरावे.

केक पात्र बेकिंग ओव्हनमध्ये १८० अंश सेल्सिअस तापमानाला २० ते २५ मिनिटे बेक करावे. तयार बीटरूट केक थंड करून सील बंद करावे.

Beetroot Processing Foods
Tomato Food Processing : टोमॅटोपासून पावडर निर्मिती

बिस्कीट

बिस्किटे अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असतात. १ किलो बीट पावडरमध्ये ३० टक्के मैदा मिसळावा. त्यामध्ये ५०० ग्रॅम साखर, १५० ग्रॅम वनस्पती तूप, ५ ग्रॅम बेकींग पावडर, ५० ग्रॅम दूध पावडर, ४ मि.लि. इसेन्स मिसळावा.

योग्य प्रमाणात पाणी घेऊन त्यांच्या लगदा करावा. तो गोळा ३० मिनिटे तसाच झाकून ठेवावा. त्यानंतर जाडसर लाटून वाटीच्या साहाय्याने त्याचे काप पाडावेत. ते काप साच्यात टाकून ओव्हनमध्ये १८० अंश सेल्सिअस तापमानाला १५ ते २० मिनिटे ठेवून द्यावे. तयार बीटरूट बिस्किटे बटरपेपर मध्ये पॅक करावी.

बर्फी

बीट स्वच्छ पाण्याने धुऊन त्यावरील साल काढून किसून घ्यावे. १०० ग्रॅम किसलेले बीट, ६० ग्रॅम खोबरे, ६० ग्रॅम साखर यांचे २५ मिलि दुधासोबत मिश्रण तयार करावे.

मिश्रणाला घट्टपणा येण्यासाठी गॅसवर १० ते १५ मिनिटे गरम करावे. दुसऱ्या बाजूला ट्रेमध्ये तुपाचे लेप लावून त्यावर तयार केलेल्या मिश्रणाचे जाड थर तयार करून घ्यावा.

तयार झालेला थर थंड करून योग्य आकारात कापून घ्यावे. तयार झालेली बीटरूट बर्फी हवाबंद डब्यामध्ये ठेवावी.

कृष्णा काळे, ८८०५९६८५३६

(लेखक अन्नप्रक्रिया तज्ज्ञ आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com