Fig Fruit Processing : अंजीर फळापासून जॅम, आरटीएस

Fig Fruit Foods : अंजीर हे एक पौष्टिक औषधी फळ आहे. अंजिरात १० ते २५ टक्के साखर असते. अंजिरामध्ये आहार मूल्याबरोबर औषधी गुणधर्म मुबलक प्रमाणात असल्यामुळे त्यापासून तयार केलेल्या पदार्थात खूप मागणी आहे.
Fig Fruit Foods
Fig Fruit FoodsAgrowon
Published on
Updated on

Food Processing :

अंजीर हे एक पौष्टिक औषधी फळ आहे. अंजिरात १० ते २५ टक्के साखर असते. अंजिरामध्ये आहार मूल्याबरोबर औषधी गुणधर्म मुबलक प्रमाणात असल्यामुळे त्यापासून तयार केलेल्या पदार्थात खूप मागणी आहे.

आरोग्यदायी फायदे

फळातील पोटॅशिअममुळे रक्तदाबाची समस्या कमी करण्यास मदत मिळते.

जास्त प्रमाणात तंतू असल्यामुळे वजनाला संतुलित ठेवायला मदत मिळते.

शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि रक्त शुद्धी करणासाठी पिकलेले अंजीर खावे, कारण अंजीर हे थंड फळ आहे.

शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते.

पोट साफ करायचे असतील तर अंजीर खावे कारण त्यामध्ये तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात.

शरीराची हानी भरून काढण्यासाठी रोज ताजे अंजीर खावे.

अंजीर हे गरोदर महिलांसाठी लाभदायक आहे. त्यामधील जीवनसत्त्व ब आणि कॅल्शिअम फायदेशीर ठरते.

अंजिरामधील जीवनसत्त्व इ हे केस पांढरे होण्यापासून वाचवते.

पोषणतत्त्वे (१०० ग्रॅम)

कॅलरी : ७४ किलो.

कर्बोदके : १९१३ ग्रॅम

प्रथिने : ०.७५ ग्रॅम

बी ६: ०.११३ मिग्रॅ.

पेन्टोनिक ॲसिड बी ५: ०.३०० मिग्रॅ.

थायमिन बी १ : ०.०६० मिग्रॅ.

रायबोप्लेवीन बी २ : ०.०५० मिग्रॅ.

कॅल्शिअम : ३५ मिग्रॅ.

लोह ः ०.३७ मिग्रॅ.

मॅग्नेशिअम : १७ मिग्रॅ.

फॉस्फरस : १४ मिग्रॅ.

पोटॅशिअम : २४२ मिग्रॅ.

Fig Fruit Foods
Custard Apple Processing : सीताफळापासून गर, पावडर निर्मिती

प्रक्रिया पदार्थ

जॅम

परिपक्व अंजीर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत. नंतर गर वेगळा करावा. जॅम बनविण्यासाठी प्रति किलो गरामध्ये ८०० ग्रॅम साखर मिसळावी. प्रति किलो ४ ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळून एकजीव मिश्रण करावे.

तयार केलेले मिश्रण स्टीलच्या पातेल्यात घेऊन मंद आचेवर शिजवावे. मिश्रण शिजवत असताना ढवळत राहावे. तयार झालेल्या मिश्रणाचा ब्रिक्स हा ६८.५ अंश इतका झाल्यावर उष्णता देणे बंद करावे.

घट्ट झालेला जॅम हा निर्जंतूक केलेल्या काचेच्या भरणीत भरावा.

बाटल्या थंड करून, त्यावर मेणाचा थर देवून किंवा अॅल्युमिनिअम फॉईल लावून हवाबंद करून झाकण लावावे. बाटल्या थंड व कोरड्या जागी साठवाव्यात.

Fig Fruit Foods
Fig Management : अंजिरातील मीठा बहर व्यवस्थापन

आरटीएस

एक किलो स्वच्छ अंजीर फळाचा गर घेऊन त्यामध्ये १ किलो साखर मिसळावी.

त्यानंतर त्यामध्ये २ ग्रॅम सायट्रिक आम्ल आणि ८ लिटर पाणी मिसळून घ्यावे.

तयार झालेले मिश्रण हे १० अंश ब्रिक्स येईपर्यंत मंद आचेवर ठेवून गरम करावे. गरम करत असताना मिश्रणाला सतत ढवळावे.

मिश्रण गरम असताना निर्जंतूक केलेल्या बाटलीमध्ये भरून नंतर थंड करावे.

सुकविलेले अंजीर

एक किलो अंजिरापासून साधारणतः २०० ते २५० ग्रॅम सुके अंजीर मिळते.

परिपक्व अंजीर फळे घ्यावीत. त्याचा टीएसएस हा १६ ते १८ टक्के असावा. निवडलेली फळे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत. त्यानंतर त्याला एका पांढऱ्या कापडा मध्ये बांधून १ ते २ टक्के केएमएसचे द्रावण बनवून त्या द्रावण्यामध्ये अर्धा तास ठेवावे. त्यानंतर फळे एका ट्रेमध्ये घेऊन पसरावीत. त्यानंतर सूर्यप्रकाशामध्ये सौर वाळवणी यंत्रामध्ये दोन ते तीन दिवस ठेवावीत.

फळामध्ये पाण्याचे प्रमाण १० ते२० टक्के झाल्यास फळे सुकली आहे असे समजावे.

सुकलेली फळे सौर वाळवणी यंत्रामधून काढून थंड करून दाबून घ्यावीत.

त्यानंतर तयार झालेले, सुकलेले अंजीर फळे ही प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करावीत. सुकविलेले अंजीर वर्षभर टिकते.

कृष्णा काळे, ८८०५९६८५३६ (अन्न प्रक्रिया तज्ञ आहेत)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com