Washim Water Revolution: जलतारा- शोषखड्डे निर्मितीत वाशीम जिल्ह्याची आघाडी

Water Conservation: वाशीम जिल्ह्यातील गावागावांमध्ये जलतारा-शोषखड्डे निर्मितीत जनचळवळ उभी राहिली आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरवून जलसंपत्ती वाढवण्याचे सकारात्मक प्रयत्न सुरू आहेत.
Jaltara Drainage Pit Formation
Jaltara Drainage Pit FormationAgrowon
Published on
Updated on

Washim News: जलसंवर्धनाच्या दिशेने वाशीम जिल्ह्यात गावागावात जनचळवळ उभी राहिली असून, या पावसाळ्यात शेतशिवारात पडणारा थेंब जमिनीत जिरवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. जिल्हा प्रशासनाचे पाठबळ, नागरिकांच्या पुढाकारातून जिल्ह्याने जलतारा -शोषखड्डे तयार करण्यामध्ये आघाडी घेतली आहे. आजवर या जिल्ह्यात सुमारे २६ हजारांवर जलतारा शोषखड्यांचे जिओ टॅगिंगसुद्धा पूर्ण झाले आहे.

भूगर्भातील पाणी साठा वाढविण्यासाठी नागरिकांनी जलतारा शोषखड्डे तयार करण्याचे काम हातात घेतले आहे. सध्या प्रत्येक गाव शिवारात अशा प्रकारचे शोषखड्डे तयार होत आहेत. यात सर्वाधिक वाशीम तालुक्यात ६६२३ जलतारा शोषखड्यांचे जिओ टॅगिंग पूर्ण झाले आहे. या शिवाय कारंजा तालुक्यात ४७५४, रिसोड ४७७२, मानोरा ३५३१, मंगरूळपीर ३७०१, मालेगाव ३३८४ असे जलतारा- शोषखड्डे तयार झाले आहेत. वास्तवात याही पेक्षा अधिक काम झाले आहे. ही आकडेवारी जिओटॅगिंग झालेल्या शोषखड्ड्यांची आहे.

Jaltara Drainage Pit Formation
Water Conservation Crisis: जलसंधारणात निधीचा दुष्काळ

नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन, प्रामुख्याने जिल्हाधिकारी बुवनेश्‍वरी एस यांनी सकारात्मक पुढाकार घेतला आहे. आजवर अनेक गावात जात त्यांनी स्वतः शोषखड्डा तयार करण्यासाठी श्रमदान केले. भूमिपूजन करीत शोषखड्डे खोदण्याचा शुभारंभही केला. गावागावांत शोषखड्डे बनविण्यासाठी स्पर्धा ठेवण्यात आली आहे. यंदा पहिल्याच पावसात वाशीम जिल्ह्यात या शोषखड्यांमध्ये कोट्यवधी लिटर पाणी जमिनीत मुरवले जाणार आहे.

Jaltara Drainage Pit Formation
Water Conservation : पावसाळ्याच्या तोंडावर ‘जलतारा’ची लगीनघाई

५०० जलतारा पूर्ण करणाऱ्या गावांना ‘कॉफी विथ कलेक्टर’ची संधी

जिल्ह्यात जलसंवर्धनासाठी सुरू असलेल्या ‘जलतारा’ अभियानात उल्लेखनीय प्रगती करणाऱ्या गावांसाठी एक विशेष सन्मान दिला जाणार आहे. ५०० किंवा त्याहून अधिक जलतारा शोषखड्डे पूर्ण करणाऱ्या गावांचे तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायक यांना जिल्हाधिकारी बुवनेश्‍वरी एस यांच्यासमवेत त्यांच्या निवासस्थानी ‘कॉफी विथ कलेक्टर’ची या विशेष कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे.

हा कार्यक्रम सोमवारी (ता.२६) आयोजित करण्यात आला आहे. यात सहभागी होण्यासाठी शनिवार (ता.२४) पर्यंत ५०० जलतारा शोषखड्डे पूर्ण करून त्यांचे जिओ टॅगिंग करणे अनिवार्य आहे. ही संधी शोषखड्डे तयार करण्याच्या कार्यात पुढाकार घेतलेल्या ग्रामपातळीवरील अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आहे. जिल्ह्यातील जलसंपत्तीची प्रभावी व्यवस्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम एक प्रेरणादायी पाऊल ठरणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com