Jackwell Update : अंबा नदीतील जॅकवेल नादुरुस्‍त

Amba River : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्‍या पाली शहरात कोणतीही शुद्धीकरण प्रक्रिया न करता थेट अंबा नदीतून पाणीपुरवठा केला जातो.
Water Update
Water Update Agrowon

Pali News : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्‍या पाली शहरात कोणतीही शुद्धीकरण प्रक्रिया न करता थेट अंबा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. सध्या अंबा नदीची पातळीत मोठी घट झाली आहे तसेच जॅकवेलमध्येही तब्बल सहा फूट गाळ साचला आहे. हा गाळ काढण्यासाठी मंगळवार, बुधवार (ता.२६ व २७) शहरातील पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

नदीच्या पातळीत घट झाल्‍याने पालीवासियांना आगामी काळात पाणीटंचाईच्या झळा बसण्याची शक्‍यता आहे. शिवाय दुरुस्‍ती कामासाठी दोन दिवस नागरिकांचे हाल सुरू आहेत. ज्‍या लोकवस्‍तीत विहीर अथवा बोअरवेल नाहीत, त्‍यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. तर काहींवर पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.

Water Update
Wells Allocation Corruption : मनरेगाच्या विहीर वाटपात भष्ट्राचाराचे ‘सिंचन’

जॅकवेलमधील गाळ काढण्यासाठी दोन दिवस पाणीपुरवठा बंद करण्यात येईल, अशा सूचना नगरपंचायतीमार्फत नागरिकांना देण्यात आल्याचे नगरसेवक आशिक मणियार यांनी सांगितले.सध्या जिल्‍ह्यातील काही तालुक्‍यात पाणीटंचाईच्या झळा जाणवत असून अनेक गाव-पाड्‌यांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुुरू करण्यात आला आहे.

प्रदूषणाचा विळखा

अंबा नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात शेवाळे तयार झाली आहे. नदी पुलाचे काम सुरू असल्याने सिमेंटचे पाणीही नदीत जाते. अंबा नदीच्या काठावर अनेक कंपन्या, फार्महाऊस, निवासी संकुल उभे राहिले आहेत. कंपन्यांमधील रसायनमिश्रित पाणी आणि सांडपाणी थेट अंबा नदी पात्रात सोडण्यात येते. रसायन व सांडपाण्याबरोबरच कचरा आणि गाळही नदीपात्रात साचला आहे. काही महिला नदीवरच धुणीभांडी करतात. सर्व प्रकारामुळे नदीच्या पाण्याला दुर्गंध येते, चवही खराब लागते. पाणी प्रदूषित झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

Water Update
Rabi Crop Harvesting : रब्बीची काढणी अंतिम टप्प्यात

शुद्ध पाणी योजना प्रलंबित :

पालीकरांसाठी जवळपास २७ कोटींची शुद्धपाणी पुरवठा योजना अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. राजकीय हेवेदावे आणि लालफितीत योजना अडकल्यामुळे पालीकर अजूनही शुद्ध पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी व तत्कालीन मंत्री यांनी शुद्धपाणी योजना कार्यान्वित करू, असे आश्वासन दिले आहे. मात्र अद्याप काहीच झालेले नाही. केवळ निवडणुकीपुरते आश्वासन देत असल्‍याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

जॅकवेलमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्‍याने नादुरुस्‍त झाला आहे. गाळ काढण्याचे व जॅकवेलचे काम युद्धपातळीवर सुरू असून काम पूर्ण झाल्यावर पालीवासीयांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी दोन दिवस सहकार्य करावे. तसेच निर्माल्य नदीपात्रात टाकू नये.
सचिन जवके, नगरसेवक, पाली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com