Mango Production : आंब्याचे ६ टन एकरी उत्पादन घेणे शक्य

Mango Season : आंबा फळ हे फळांचा राजा म्हणून सर्वसामान्यांपासून श्रीमंत लोकांपर्यंत अत्यंत आवडीचे फळ आहे.
Mango Production
Mango ProductionAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : आंबा फळ हे फळांचा राजा म्हणून सर्वसामान्यांपासून श्रीमंत लोकांपर्यंत अत्यंत आवडीचे फळ आहे. १.५ बाय ४ मीटर अंतरावर अतीघन पद्धतीने लागवड करून, वळण व छाटणी तंत्र आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन केल्यास आंब्याचे ६ टन एकरी उत्पादन घेणे सहज शक्य होत असल्याचे मत डॉ. भगवानराव कापसे यांनी व्यक्त केले.

आंबा या फळ पिकाच्या उत्पादनातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने विदर्भातील केव्हीके वाशीमच्या वतीने आधुनिक पद्धतीने आंबा लागवडीस प्रोत्साहन देण्याकरिता जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी स्वखर्चाने अभ्यास दौऱ्याच्या आयोजन मागील महिन्यात करण्यात आले होते.

त्यानंतर शेतकरी आंबा लागवडीस तयार झाले. या शेतकऱ्याना आधुनिक लागवड तंत्राची माहिती देण्याच्या हेतूने कृषी विज्ञान केंद्र, करडा, वाशीम व महाकेशर आंबा बागायतदार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने अतिघन आंबा लागवड तंत्र या विषयावर शनिवारी (ता. ६) ऑनलाइन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.

Mango Production
Mango Marketing : आंब्याचे मार्केटिंग करताना ‘क्यूआर कोड’चा वापर करावा

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाकेशर आंबा बागाईतदार संघ अध्यक्ष नंदलाल काळे यांची, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ आंबातज्ज्ञ डॉ. कापसे व केव्हीके वाशीमचे उद्यानविद्या तज्ञ निवृत्ती पाटील यांची उपस्थिती लाभली.

प्रमुख पाहुणे म्हणून केव्हीके प्रमुख डॉ. रवींद्र काळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकरराव तोटावार, डॉ. संजय पाटील, सेवानिवृत्त कृषी अधिकारी अनिल बोंडे, रवी काळे, तहसीलदार आणि मंडळ कृषी अधिकारी रवींद्र जयताळे यांची उपस्थिती लाभली.

तांत्रिक सत्रात डॉ. कापसे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना अतीघन आंबा लागवड तंत्रज्ञान याबद्दल सविस्तरपणे मार्गदर्शन करीत भारतातील व महाराष्ट्रातील या पिकाची सद्यःस्थिती मांडत कमी उत्पादकतेची कारणे विशद केली. निवृत्ती पाटील यांनी अतीघन आंबा लागवडीचे अर्थशास्त्र विशद केले.

येत्या हंगामात किमान २५ बागांची प्रायोगिक तत्त्वावर लागवड करण्यात येईल, असे सांगितले. डॉ. काळे यांनी केव्हीकेच्या माध्यमातून शेतकऱ्याना संपूर्ण तांत्रिक पाठबळ देऊन या पिकाच्या माध्यमातून पीक बदल करण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल असे सांगितले.

Mango Production
Mango Crop Damage : सुरगाणा तालुक्यात पावसाने आंब्याचे नुकसान वाढले

श्री. तोटावार यांनी शाश्‍वत पाण्याची उपलब्धता असल्यावरच आंबा लागवडीचे नियोजन करावे व त्याकरिता कृषी विभागाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जल संवर्धन व शेततळे करावे, असे आवाहन केले.

अनिल बोंडे यांनी विदर्भात आंबा पिकाला मोठा वाव असून लागवडीसोबतच प्रक्रिया व विक्री या बाबींवर प्रकाश टाकला. अध्यक्षीय मार्गदर्शनात श्री काळे यांनी महाकेसर संघाची भूमिका व कार्यपद्धती विशद केली.

सूत्रसंचालन गोपाल बोरकर यांनी तर आभार प्रदर्शन, रवींद्र जयताळे यांनी केले. वाशीम व इतर जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com