Talathi Sajja : कामकाजाचे वेळापत्रक लावणे तलाठ्यांना बंधनकारक

Revenue Department : कार्यालयात तलाठी उपस्थित राहत नाहीत. लोकांच्या सोयीसाठी राज्य सरकारने तलाठी कार्यालयात कामकाजाच वेळापत्रक लावण्यास बंधनकारक करण्यात आले आहे.
Talathi Sajja
Talathi SajjaAgrowon

Revenue Officer : तलाठी सज्जात वेळेत उपस्थित राहत नाहीत, अशा तक्रारी येत असल्याने राज्य सरकारने त्याची गंभीर दखल घेतली आहे. तलाठ्यांनी कामकाजाचे वेळापत्रक सज्जात लावावे, दौरा आणि अन्य कामकाजानिमित्त गैरहजर राहणार असतील तर तसा फलक सज्जात लावावा, असे आदेश महसूल विभागाने दिले आहेत.

महसूल विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात तलाठ्यांसाठी कामकाजाची आचारसंहिता तयार करून दिली आहे. त्याचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या राज्यात तलाठ्यांची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांची भरतीप्रक्रिया पूर्ण होऊन नवीन तलाठी उपलब्ध होईपर्यंत एका तलाठ्याकडे एकापेक्षा जास्त सज्जांचा कार्यभार राहील. त्यामुळे जनतेची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी राज्य सरकारने आदेश दिले आहेत.

Talathi Sajja
Talathi Recruitment : साडेदहा लाख उमेदवार तलाठी होण्यासाठी इच्छुक

तलाठी हे गावपातळीवरील नागरिकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे पद आहे. विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी नागरिकांना तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो. तसेच शेतकऱ्यांशी निगडित पीकपाहणीची ई-पीकपाहणी, नुकसानीचे पंचनामे करणे, दुष्काळ, अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती इत्यादी प्रसंगी मदत व पुनर्वसनाचे काम करण्यासाठी तलाठी अतिशय महत्त्वाचा दुवा आहेत. परंतु सध्या तलाठ्यांकडे एकापेक्षा जास्त गावांचा भार आहे.

तसेच वरिष्ठ कार्यालयातील बैठका, पंचनामे, स्थळपाहणी आदी कारणांनी त्यांना कार्यालयाच्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहता येत नाही. नागरिकांना देखील तलाठ्याची उपस्थित राहण्याची वेळ समजत नाही. त्यामुळे तलाठी अनुपस्थितीच्या अनेक तक्रारी जनतेकडून शासनाकडे केल्या जात होत्या. त्यामुळे शासनाने याबाबतचे परिपत्रक काढून तलाठ्यांना सज्जाच्या ठिकाणी उपस्थित राहण्याबाबतचे वेळापत्रक तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

४ हजार ६४४ पदांची भरती प्रक्रिया सुरू

सद्यःस्थितीत तलाठी गट-क संवर्गाची एकूण मंजूर पदे १५ हजार ७४४ इतकी आहेत. त्यापैकी ५ हजार ३८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे एका तलाठ्याकडे एकापेक्षा जास्त सज्जाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. रिक्त तलाठी पदांपैकी ४ हजार ६४४ पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन तलाठी उपलब्ध होईपर्यंत उपलब्ध तलाठ्यांवर अधिक भार राहणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com