Nanded News: बदलत्या काळात शेतीमध्ये ज्ञानाधिष्ठित, तंत्रस्नेही व वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून उत्पादनवाढ, खर्च नियंत्रण व उत्पन्नवाढीचे नवे मार्ग शोधावेत, असे त्यांनी आवाहन केले..सगरोळी कृषी विज्ञान केंद्रात पाणी फाउंडेशन फार्मर कप स्पर्धा २०२६ अंतर्गत २ ते ४ फेब्रुवारी या कालावधीत तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. या निवासी प्रशिक्षणासाठी कंधार तालुक्यातील विविध गावांतून शेतकरी उपस्थित होते. यात आधुनिक शेती तंत्रज्ञान, शाश्वत शेती पद्धती, गटशेती, मूल्यवर्धन, शेतीपूरक उद्योग, बाजारपेठ व्यवस्थापन तसेच शेतीतील नव्या संधी याबाबत सखोल व प्रात्यक्षिकाधारित मार्गदर्शन देण्यात आले.. Scientific Agriculture : शास्त्रोक्त शेती काळाची गरज ः धर्मा काळे.प्रशिक्षण काळात शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य, आत्मविश्वास आणि बदलाची सकारात्मक जाणीव स्पष्टपणे दिसून आली. कार्यक्रमास आत्माच्या उपसंचालक अर्चना गुंजकर, कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन प्रमोद देशमुख, .Scientific Advisory Meeting: कणेरी केव्हीकेत वैज्ञानिक सल्लागार समिती बैठक.पाणी फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य समन्वयक सत्यवान देशमुख, नांदेड विभागीय समन्वयक प्रवीण काथवटे, संदीप चव्हाण, उमेदचे कंधार तालुका व्यवस्थापक, अश्वमेध ग्रामीण पाणलोट क्षेत्र विकास व शैक्षणिक संस्था, कंधार येथील विविध विभागांचे अधिकारी, .तज्ज्ञ मार्गदर्शक उपस्थित होते. या प्रशिक्षणातून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची स्पष्ट दिशा, नव्या संधींची ओळख आणि शाश्वत शेतीचा मार्ग मिळाल्याचा अभिप्राय व्यक्त करण्यात आला. प्रशिक्षणार्थींनी तीन दिवसांच्या अनुभवांबाबत समाधान व्यक्त करत भविष्यात आपल्या शेतीत सकारात्मक बदल घडवून आणण्याचा दृढ संकल्प व्यक्त केला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.