Irrigation Backlog : सिंचन अनुशेषाची पश्चिम विदर्भाला केवळ अडीच हजार कोटींची तरतूद

Vidarbha Irrigation : पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येस असलेल्या प्रमुख कारणांपैकी सिंचनाचा अभाव हे एक कारण मानले जात आहे.
Agriculture Irrigation
Agriculture IrrigationAgrowon
Published on
Updated on

Amaravati News : पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येस असलेल्या प्रमुख कारणांपैकी सिंचनाचा अभाव हे एक कारण मानले जात आहे. या भागात जून २०२४ अखेर सिंचनाचा ३ लाख ५७ हजार ७११ हेक्टरचा अनुशेष शिल्लक असून त्यासाठी निधीची बोंब आहे. हा अनुशेष भरून काढण्यासाठी ३५ हजार ७२० कोटी रुपयांची गरज असताना राज्य सरकारने २ हजार ५९० कोटींची तरतूद केली असल्याने अनुशेष निर्मूलनाप्रती राज्य सरकारची गंभीरता स्पष्ट झाली आहे.

पश्चिम विदर्भात मोठे, मध्यम व लघू, असे ३६० प्रकल्प आहेत. यापैकी २०५ प्रकल्प पूर्ण झाले असून १५५ बांधकामाधीन आहेत. बांधकामाधीन असलेल्या १५५ पैकी ४० प्रकल्पांतून अंशतः सिंचन सुविधा उपलब्ध झाली आहे. अमरावती विभागाची एकूण प्रकल्पीय सिंचन क्षमता नऊ लाख १८ हजार ५०९ हेक्टरची असून पाच लाख ४९ हजार ४८४ हेक्टर इतकी निर्मित सिंचन क्षमता आहे.

Agriculture Irrigation
Agriculture Irrigation : शेती सिंचनासाठी विशेष अभियान

अद्याप तीन लाख ५७ हजार ७११ हेक्टरचा अनुशेष कायम आहे. हा अनुशेष भरून काढण्यासाठी चाळीस प्रकल्प पूर्ण करणे आवश्यक असून त्यासाठी लागणारा निधी पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिला जात नसल्याने अनुशेषाची बोंब कायम आहे.

दरम्यान, जून २०२४ च्या पातळीवर अमरावती व यवतमाळ जिल्ह्यांचा अनुशेष पूर्ण भरून निघाला असल्याचे जलसंपदा विभागाने म्हटले असून शिल्लक असलेला बुलडाणा व अकोला (वाशीम मिळून) जिल्ह्याचा अनुशेष जिगाव आणि लोअर निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या पूर्णतेवर अवलंबून आहे.

Agriculture Irrigation
Agriculture Irrigation Scheme: धडक सिंचन विहिरींचा कार्यक्रम शासन गुंडाळणार

अपूर्ण असलेल्या चाळीस प्रकल्पांची अद्ययावत किंमत ७० हजार ७७३ कोटी रुपये इतकी असून मार्च २०२५ अखेर त्यावर ३१ हजार ३४१.४ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. मार्च २०२५ अखेर या प्रकल्पासाठी ३९ हजार ४३१ कोटी रुपयांची गरज असून यंदा अर्थसंकल्पीय तरतूद दोन हजार ५९० कोटी रुपयांची करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाने या सर्व प्रकल्पांच्या पूर्णत्वाचे वर्ष २०४० पर्यंत नियोजन केले आहे.

वैधानिक मंडळांचे पुनरुज्जीवन नाही

विदर्भ वैधानिक मंडळातून सिंचन प्रकल्पांसाठी निधी मिळत होता. वैधानिक मंडळांचे युती व महाविकास आघाडी सरकारच्या काळात पुनरुज्जीवनच झालेले नाही. या मंडळांना राज्यपालांच्या आदेशाने निधी मिळत होता, ते मंडळच नसल्याने बंद आहे. नवीन महायुती सरकारनेही या मंडळांच्या पुनरुज्जीवनासाठी रस दाखविलेला नाही.

पूर्णत्वाचे नियोजन ः जून २०२५ ः सपन, चंद्रभागा बॅरेज

जून २०२६ ः गर्गा, चांदस वाठोडा, वर्धा बॅरेज, कोची, अंबाझरी, अमडापूर, काटेपूर्णा बॅरेज

जून २०२७ ः अप्पर वर्धा, पंढरी, वासनी, राजुरा, टाकळी डोल्हारी, महादापूर, जिगाव टप्पा १, अरकचेरी, सत्तर सावंगा, घोटा शिवणी, बोरव्हा

जून २०२८ ः खर्डा, प्रिंप्री मोडक,

जून २०३२ ः जिगाव टप्पा २

निम्न पैनगंगा ः जून २०४०

Vidarbha Irrigation
Vidarbha IrrigationAgrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com