Irrigation Council : सांगोल्यात ९ आणि १० मार्चला होणार सिंचन परिषद

Irrigation Management : सांगोला महाविद्यालयात ९ आणि १० मार्च रोजी २१ वी महाराष्ट्र सिंचन परिषद होणार असून, या परिषदेच्या आयोजनाची पूर्व तयारी आढावा बैठक मंगळवारी (ता. ३०) सांगोला महाविद्यालयात पार पडली.
Irrigation Council
Irrigation CouncilAgroown

अॅग्रोवन वृत्तसेवा
Solapur News : सोलापूर ः सांगोला महाविद्यालयात ९ आणि १० मार्च रोजी २१ वी महाराष्ट्र सिंचन परिषद होणार असून, या परिषदेच्या आयोजनाची पूर्व तयारी आढावा बैठक मंगळवारी (ता. ३०) सांगोला महाविद्यालयात पार पडली. सिंचन परिषदेच्या माध्यमातून आदर्श जलव्यवस्थापन सामान्य नागरिक, शेतकऱ्यांपर्यंत पोहचवले जावे, या उद्देशाने ही परिषद होत असल्याची माहिती महाराष्ट्र सिंचन सहयोगचे अध्यक्ष डॉ. दि. मा. मोरे यांनी दिली.

या वेळी सांगोला तालुका शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबूराव गायकवाड, संस्था विश्वस्त, प्राचार्य सुरेश भोसले, माजी निवृत्त प्राचार्य आप्पासाहेब पुजारी, निवृत्त कार्यकारी संचालक कृष्णा खोरे प्रफुल्ल झपके, निवृत्त जलसंपदा अभियंता सुधाकर चौधरी, वनश्री अतुल खेळले, रामेश्वर म्हेत्रे उपस्थित होते.

Irrigation Council
Veterinarian Council : पशुवैद्यक परिषद दुर्लक्षितच!

शेतकरी, सामान्य नागरिक, विशेषतः नवतरुण विद्यार्थ्यांपर्यंत सिंचनाचे, जलव्यवस्थापनाचे महत्त्व पोहचले पाहिजे. पाणी आणि त्याचे उत्तम व्यवस्थापन करून या राज्यात अनेकांनी आपली शेती यशस्वी केली, अशा यशस्वी शेतकरी, नोकरदार वर्गातील हा आदर्श इतरांनी देखील अंगीकारला पाहिजे, असे डॉ. मोरे यांनी सांगितले.

सिंचन परिषदेमध्ये कोणते विषय हवेत, कोणते वक्ते हवेत, यासह दोन दिवसांच्या कार्यक्रमावर आम्ही चर्चा केली, लवकरच अंतिम तयारी पूर्ण होईल, असे अतुल खेळले यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com