श्रीलेश मांडेपारंपरिक पीक व्यवस्थापन पद्धतींमध्ये अंदाजावर आधारित निर्णय घेतले जातात, ज्यामुळे संसाधनांचा अपव्यय होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर इंटरनेट ऑफ थिंग्ज आधारित स्वयंचलित पीक व्यवस्थापनात मूलभूत बदल शक्य आहेत. ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज' तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये विविध उपकरणे, सेन्सर्स आणि यंत्रणा इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांशी जोडलेल्या असतात. ही उपकरणे सतत माहिती गोळा करतात. .ही माहिती क्लाउडवर पाठवली जाते आणि ठरवलेल्या नियमांनुसार आपोआप निर्णय घेतले जातात. शेतातील यंत्रे माहितीच्या आधारे स्वतः निर्णय घेऊन काम करतात. हीच ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ तंत्रज्ञानाची संकल्पना आहे. या तंत्रज्ञानामध्ये सिंचन आणि खत व्यवस्थापनासाठी मुख्यतः वेळापत्रक आधारित स्वयंचलित पद्धती आणि सेन्सर आधारित स्वयंचलित पद्धतीचा वापर केला जातो. या तंत्रज्ञानामुळे पाणी, खत, वेळेमध्ये बचत होते. पिकाचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढते..Smart Farming: पपई- मिरची- खरबूज पद्धतीतून उत्पन्नाचा हुकमी स्रोत .तंत्रज्ञानाचा वापरसेन्सर्स ः मातीतील आर्द्रता, तापमान, पाण्याचा दाब इ. मोजतात.कंट्रोल युनिट ः सेन्सरकडून आलेल्या डेटाचे विश्लेषण केले जाते.कनेक्टिव्हिटी ः डेटा क्लाउडवर पाठवला जातो.मोबाइल अॅप/डॅशबोर्ड ः निरीक्षण, नियंत्रण सुविधा मिळते..वेळापत्रक आधारित स्वयंचलित पद्धतीयामध्ये सिंचन पूर्वनिश्चित वेळापत्रकानुसार केले जाते. उदा. दररोज सकाळी ६ वाजता ४५ मिनिटे आणि संध्याकाळी ५ वाजता ३० मिनिटे पाणी देणे.वैशिष्ट्येठरावीक दिवस व वेळेनुसार नियंत्रण.सोपी अंमलबजावणी.स्थिर आणि व्यवहार्य प्रणाली..Smart Farming: पारंपरिक गहू, फळपिकांच्या नियोजनातून बसविले आर्थिक गणित.फायदेतांत्रिक गुंतागुंत कमी, खर्च तुलनेने कमी.देखभाल सोपी, व्यापक वापर.मर्यादाहवामान किंवा मातीतील प्रत्यक्ष स्थितीनुसार आपोआप बदल होत नाही.काही परिस्थितीत जास्त किंवा कमी पाणीपुरवठा होऊ शकतो.सेन्सर आधारित स्वयंचलित पद्धतीयामधील सेन्सर्स मातीतील आर्द्रता, तापमान, आर्द्रता इत्यादी माहिती सतत गोळा करतात.ठराविक मर्यादेपेक्षा आर्द्रता कमी झाल्यास प्रणाली आपोआप सिंचन सुरू करते..वैशिष्ट्येरिअल-टाइम डेटा आधारित निर्णय.हवामानानुसार समायोजन.सैद्धांतिकदृष्ट्या अधिक अचूक सध्याची स्थिती..सेन्सर आधारित स्वयंचलित पद्धती अजूनही अनेक ठिकाणी प्रायोगिक तत्वावर वापरले जात आहे. कारण विविध माती प्रकारांमध्ये अचूक कॅलिब्रेशनची गरज आहे. सेन्सरचा दीर्घकालीन टिकाऊपणा महत्वाचा ठरतो. भविष्यात अधिक अचूक व टिकाऊ सेन्सर्स विकसित होत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित निर्णयप्रणालीमध्ये सुधारणा होत आहे.- श्रीलेश मांडे ७०२०९६४८९३( सहसंस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी, इंडस्टील फार्मटेक प्रा.लि.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.