Agriculture Innovation: मराठा विद्या प्रसारक (मविप्र) समाज संस्थेच्या सीएमसीएस महाविद्यालयातील प्रा. स्वाती तपकिरे-उगले यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे नुकतीच पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी ‘द्राक्ष पिकांच्या उत्पादनवाढीसाठी आयओटी तंत्रज्ञानावर आधारित निरीक्षण प्रणालीचा अभ्यास’ या विषयावर संशोधन सादर केले..नाशिक जिल्हा द्राक्ष उत्पादनात आघाडीवर असला, तरी येथील शेती मोठ्या प्रमाणावर लहरी हवामानावर अवलंबून आहे. या पार्श्वभूमीवर प्रा. तपकिरे-उगले यांनी ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ (आयओटी) आधारित स्वयंचलित निरीक्षण प्रणालीची परिणामकारकता अभ्यासली आहे..Grape Farming: सद्य:स्थितीत छाटणीपूर्व काळातील रणनीती.या संशोधनात स्मार्ट इरिगेशनच्या माध्यमातून गरजेनुसार पाणीपुरवठा, बागेतील आर्द्रता व तापमानाचे ‘रिअल टाइम’ विश्लेषण, रोग नियंत्रण, मजुरी व खत खर्चात बचत आणि फळांची जागतिक दर्जाची गुणवत्ता टिकवून ठेवण्याबाबत तांत्रिक मॉडेल सादर करण्यात आले आहे..Agriculture Research: ‘पोकरा’तून संवर्धित शेतीबाबत संशोधन.तसेच तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणींवरही संशोधनात प्रकाश टाकण्यात आला आहे. या संशोधनासाठी त्यांना आयएमआरटी महाविद्यालयातील प्रा. डॉ. दीपक नांद्रे आणि डॉ. एस. एन. शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल ‘मविप्र’ संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, प्राचार्य डॉ. मधुकर शेलार, तसेच संचालक मंडळाने त्यांचे अभिनंदन केले..द्राक्ष शेतीतील अनिश्चितता कमी करून शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वयंपूर्ण करणे, हाच या संशोधनाचा मुख्य उद्देश असून हे यश नाशिकच्या कृषी प्रगतीसाठी समर्पित आहे. प्रा. स्वाती तपकिरे-उगले.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.