Ajit Pawar Speech : पीक विमा योजनेतील घोटाळ्याची चौकशी सुरू; उपमुख्यमंत्री पवारांचा शेतकऱ्यांना इशारा

Pik Vima yojana Maharashtra : योजनांबद्दल कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा शेतकऱ्यांना दिला आहे. इंदापूर येथील कृषी प्रदर्शनात उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी (ता.२६) बोलत होते. यावेळी त्यांनी पीक विमा योजनेतील घोटाळ्याबाबत कारवाई करण्याचे संकेतही दिले.
Ajit Pawar Speech
Ajit Pawar Speech Agrowon
Published on
Updated on

crop insurance scheme scam : एक रुपया पीकविमा योजनेत घोटाळा झाल्याने राज्यभर शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच योजनांबद्दल कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा शेतकऱ्यांना दिला आहे. इंदापूर येथील कृषी प्रदर्शनात उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी (ता.२६) बोलत होते. यावेळी त्यांनी पीक विमा योजनेतील घोटाळ्याबाबत कारवाई करण्याचे संकेतही दिले.

अजित पवार म्हणाले, "चांगल्या योजना सरकार देण्याचा प्रयत्न करतं, पण त्याचा गैरफायदा घेतला जातो. एक रुपयांत पीक विमा योजनेत मोठ्या प्रमाणात गडबड झाल्याचं कानावर येत आहे. त्याची चौकशी सुरू आहे. परंतु असं जर घडलं तर नाईलाजस्तव आम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागतात." असा इशारा अजित पवारांनी दिला आहे.

अजित पवारांनी शेतकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सरकार चांगल्या योजना राबवतं पण घोटाळा झाल्यास कठोर निर्णय घ्यावा लागतो, असाही इशारा पवारांनी दिला. शेतकऱ्यांना आवाहन करताना पवार म्हणाले, "माझ्या शेतकरी बांधवांनो अशी वेळ आपल्या समाजावर येऊ देता कामा नये, याची काळजी घ्या." असंही पवारांनी सांगितलं.

राज्यात १ रुपयांत पीक विमा योजनेतून ३५० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे आरोप करत तत्कालीन कृषिमंत्री मुंडे यांचे सर्व निर्णय रद्द करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. तसेच भाजपचे आमदार सुरेश धसांनी बीड, परभणी, नांदेड, धाराशिव जिल्ह्यात बोगस पीकविमा सीएससी सेंटरवरून भरण्यात आल्याचे आरोप केले. त्यावरून खळबळ निर्माण झाली.

Ajit Pawar Speech
Ajit Pawar Speech In VSI : गुऱ्हाळांच्या कारभारला लगाम घालण्यासाठी निर्णय घेणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती

दरम्यान आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने देखील एक रुपयांऐवजी १०० रुपये शुल्क विम्यासाठी आकारण्याची शिफारस राज्य सरकारला केली आहे. सीएससी सेंटरवरून बोगस विमा उतरवला जात असल्याकडे समितीने लक्ष वेधलं आहे. पीक विमा योजनेतील दोषीवर कारवाई करण्यात येणार असल्याचं यापूर्वी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं आहे. आता उपमुख्यमंत्र्यांनी कारवाईचा इशारा दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com