Engineers Day Special : विद्यार्थ्यांकडून शेतीप्रश्‍नांवर पर्याय देणारे आविष्कार

चांदवड येथील जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात कृषीसंबंधी १६ संशोधने
Engineers Day Special : विद्यार्थ्यांकडून शेतीप्रश्‍नांवर पर्याय देणारे आविष्कार
Agrowon

नाशिक : शेतीप्रश्‍नांवर कृषी यांत्रिकीकरणाच्या (Mechanization) माध्यमातून सक्षम पर्याय देण्यासाठी चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम संचलित स्व. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यांत्रिकी व संगणक विभागातील विद्यार्थ्यांचे निरंतर संशोधन (Research) सुरूच असते. विद्यार्थी ग्रामीण भागातील असल्याने शेतीच्या समस्यांवर पर्याय देणारे गेल्या ६ वर्षांत १६ संशोधने पूर्ण केली आहेत. या संबंधीचे अर्ज पेटंट मिळण्यासाठी दाखल केले आहेत. त्यापैकी कृषी यांत्रिकीकरण ११, तर आयओटी आधारित ३ संशोधनांचा त्यात समावेश असून ते प्रकाशित झाले आहेत.

Engineers Day Special : विद्यार्थ्यांकडून शेतीप्रश्‍नांवर पर्याय देणारे आविष्कार
Soybean Rate: सोयाबीन कधी विकायचं ते कसं ठरवाल? | Agrowon

कृषिप्रधान देशात तांत्रिक शिक्षणाचा उपयोग शेतकऱ्याचे प्रश्‍न सोडविण्यासाठी होत असल्याने संशोधनाला मोठा वाव मिळत आहे. नवकल्पना, कौशल्य वापरून नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कामात सुलभता येण्यासह श्रम, वेळ व खर्चाची बचत होण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.त्यास महाविद्यालयाकडून सातत्याने पाठबळ मिळत आहे. यासाठी यांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख डॉ. संतोष संचेती, प्रा. विनयकुमार जाधव, राहुलकुमार सोनार, जितेंद्र पगार, मंगेश अहिरे, राजेंद्र चौधरी तर संगणक विभाग प्रमुख डॉ. महेश संघवी, भावना खिंवसरा, कैंजन संघवी आदींचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्‍वास वाढीस लागला आहे. परिसरात फळे व भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. त्याच अनुषंगाने साध्य प्रश्‍नावर संशोधक वृत्तीतून विद्यार्थ्यांना समाधानकारक उपाय शोधले आहेत. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या माध्यमातून केलेली ही नेत्रदीपक कामगिरी म्हणता येईल.

Engineers Day Special : विद्यार्थ्यांकडून शेतीप्रश्‍नांवर पर्याय देणारे आविष्कार
Cotton Boll Worm : कापूस पट्ट्यात पुन्हा बोंडअळीचा प्रादुर्भाव

प्रमुख संशोधने
भाजीपाला लागवड यंत्र, मका लागवड यंत्र, ऊस लागवड यंत्र, स्मार्ट कांदा लागवड यंत्र, बहुपयोगी कांदा काढणी यंत्र, नावीन्यपूर्ण ऊस लागवड यंत्र, द्राक्ष बागेसाठी ट्रॅक्टरचलित तण काढणी यंत्र, ऑटोमोटिव्ह सर्व्हिस स्टेशनसाठी बहुउद्देशीय हायड्रोलिक जॅक, ट्रॅक्टरचलित शेती अवशेष व मल्चिंग पेपर गुंडाळणी यंत्र, ट्रॅक्टरने वापरता येणारे स्वयंचलित आळवणी यंत्र, जैव-खते पसरवणारे यंत्र, पिकअप हायड्रॉलिक डंप सिस्टिम, स्मार्ट कांदा गोदाम, आयओटी व इमेज प्रोसेसिंग आधारित रोग शोध प्रणाली, द्राक्षावरील डाऊनी मिल्ड्यू रोग शोधण्यासाठी इमेज प्रोसेसिंग आधारित आयओटी संरचना.

Engineers Day Special : विद्यार्थ्यांकडून शेतीप्रश्‍नांवर पर्याय देणारे आविष्कार
Crop Damage : जिल्ह्यातील सोयाबीन, तूर, मूग, उडीद पिके पाण्यात

प्रतिक्रिया
शेतकऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाचा मोठा वाटा आहे. मात्र ते महागडे असल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांना परवडणारे नाही. या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांचीच मुले आता अभियांत्रिकी शिक्षण घेत असतानाच ज्ञानाचा सदुपयोग करून अल्प खर्चात शेतीचे प्रश्‍न सोडविण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्यास महाविद्यालयाने सातत्याने पाठबळ दिल्याने नवनवीन आविष्कार समोर येत आहेत.
- डॉ. महादेव कोकाटे, प्राचार्य, स्व. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालय
----
आम्ही शेतकरी कुटुंबातून येतो. त्यामुळे शेती करताना दैनंदिन कामकाजात येणाऱ्या आमच्या पालकांच्या अडचणी आम्ही सातत्याने अनुभवतो आहोत. त्यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. कमी खर्चात यंत्र बनवून ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.
- हृषिकेश लभडे, विद्यार्थी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com