Vehicle Checking : आंतरराज्य मालवाहतूक, प्रवासी वाहनांची कसून तपासणी करावी

State Excise Department, Deputy Commissioner Sagar Dhomkar : आंतरराज्य मालवाहतूक व प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांची दोन्ही बाजूंकडील चेक पोस्टवर कसून चौकशी करावी, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे विभागीय कार्यालयाचे उपायुक्त सागर धोमकर यांनी दिले.
Deputy Commissioner Sagar Dhomkar
Deputy Commissioner Sagar DhomkarAgrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदार संघांसाठी ७ मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात कर्नाटक राज्यातून कोणत्याही प्रकारे अवैध दारू येणार नाही व येथून कर्नाटक राज्यात जाणार नाही, यासाठी दोन्ही राज्यांतील उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी परस्परांत समन्वय ठेवून आंतरराज्य मालवाहतूक व प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांची दोन्ही बाजूंकडील चेक पोस्टवर कसून चौकशी करावी, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे विभागीय कार्यालयाचे उपायुक्त सागर धोमकर यांनी दिले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या उत्पादन शुल्क विभागाची आंतरराज्य समन्वय बैठक सोलापुरात नुकतीच झाली. या वेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त श्री. धोमकर मार्गदर्शन करत होते. या वेळी विजयपुरा जिल्ह्याचे उपायुक्त शिवलिंगप्पा बनाटी,

Deputy Commissioner Sagar Dhomkar
Agriculture Technology : पऱ्हाटी व्यवस्थापनासाठी श्रेडर!

अधीक्षक जगदीश इनामदार, गुलबर्गा जिल्ह्याच्या उपायुक्त आफरीन सय्यद, अधीक्षक एन. सी. पाटील, उपअधीक्षक होनप्पा ओलेकर, सलगरे, निरीक्षक भीमन्ना राठोड, बी दौलतराय, बसवराज कित्तूर तसेच सांगली जिल्ह्याचे अधीक्षक प्रदीप पोटे, सोलापूर जिल्ह्याचे उपअधीक्षक संजय पाटील, निरीक्षक नंदकुमार जाधव, जगन्नाथ पाटील, सचिन भवड, दुय्यम निरीक्षक सौरभ भोसले उपस्थित होते.

विभागीय उपायुक्त श्री. धोमकर म्हणाले, की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर दोन्हीही राज्यात आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन झाले पाहिजे. या निवडणुका निर्भय व खुल्या वातावरणात होण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्य उत्पादन शुल्क विभागाने परस्परांत समन्वय ठेवून अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध संयुक्तपणे मोहीम उघडली पाहिजे.

Deputy Commissioner Sagar Dhomkar
Record Break Sugarcane Production : माळरानावर एकरी १२० टन घेतलं उसाचं उत्पादन, कृषी पदवीचा असा केला वापर

आंतरराज्य मालवाहतूक व प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची अत्यंत सूक्ष्मपणे तपासणी करावी. तसेच अन्य वाहनांचीही कसून चौकशी करून एकाही वाहनातून अवैध दारू वाहतूक होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

या वेळी गुलबर्गा व विजयपुरा जिल्ह्यांतील विभागीय उपायुक्तांनीही आचारसंहिता कालावधीत दोन्ही राज्यांतील अधिकाऱ्यांनी परस्परांमध्ये समन्वय राखून व एकमेकांच्या संपर्कात राहून अवैध दारूची वाहतूक व विक्री होणार नाही, या बाबत पुरेपूर दक्षता घेणे बाबत सर्व अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रारंभी बैठकीचे प्रास्ताविक सोलापूरचे उत्पादन शुल्क उपअधीक्षक नितीन धार्मिक यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com