Cooperative Credit Society : अनिष्ट तफावतीवरील व्याज बंद

Credit Society : अनिष्ट तफावतीत असलेल्या जिल्ह्यातील विविध कार्यकारी सोसायट्यांना व्याजाचा मोठा भुर्दंड बसत होता. त्यामुळे दिवसेंदिवस ही रक्कम वाढत जात होती.
Rajmata Jijau Credit Society
Rajmata Jijau Credit SocietyAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : अनिष्ट तफावतीत असलेल्या जिल्ह्यातील विविध कार्यकारी सोसायट्यांना व्याजाचा मोठा भुर्दंड बसत होता. त्यामुळे दिवसेंदिवस ही रक्कम वाढत जात होती. त्यामुळे या संस्थांना दिलासा देण्यासाठी जिल्हा बँकेने अनिष्ट तफावतीवर लावण्यात येणारे व्याज या वर्षापासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

जळगाव जिल्ह्यात एकूण ८७६ विविध कार्यकारी संस्था आहेत. यापैकी ५५३ संस्था अनिष्ट तफावतीत आहेत. त्याची एकूण रक्कम ६०५ कोटी १० लाख रुपये आहे. यात ५० लाखांवरील अनिष्ट तफावतीच्या २९१ संस्था आहेत. त्यांची एकूण रक्कम ६४९ कोटी १३ लाख रुपये आहे.

Rajmata Jijau Credit Society
Credit Society : पतसंस्थांचे डिसेंबरमध्ये राष्ट्रीय महाअधिवेशन

या अनिष्ट तफावतीवर जिल्हा बँकेतर्फे ११ टक्के व्याज दराचा भुर्दंड बसत होता. विविध कार्यकारी सोसायटीवरील अनिष्ट तफावतीची रक्कम दरवर्षी वाढतच होती. त्यामुळे विविध कार्यकारी सोसायटीची थकबाकीची रक्कमही वाढत असल्याने त्यांना अडचणी निर्माण होत होत्या.

जिल्हा बँकेने या सोसायट्यांवर असलेल्या अनिष्ट तफावतीच्या रकमेवर असलेले व्याजदर बंद करण्याचा प्रस्ताव संचालक मंडळाच्या सभेत ठेवला होता. अध्यक्ष संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत संचालक मंडळाने १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ अखेरचे व्याज बंद करण्यास मंजुरी दिली आहे.

Rajmata Jijau Credit Society
Credit Society : विकास सेवा सोसायटींना मिळणार किरकोळ खत विक्रीचे परवाने

दिलासा मिळणार

ग्रामीण विकासाच्या दृष्टीने विविध कार्यकारी सोसायट्या महत्त्वाच्या आहेत. अनिष्ट तफावतीवर व्याज आकारणी होत असल्याने त्यांच्या थकाबाकीत वाढ होत होती. भविष्यात हीच आकारणी सुरू राहिल्यास अनेक सोसायट्या बंद झाल्या असत्या. पर्यायाने बँकही डबघाईस आली असती. व्याज बंद झाल्याने सोसायट्यांना दिलासा मिळणार आहे. व भविष्यात बँकेलाही फायदा होणार असल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यातील अनिष्ट तफावतीची माहिती

संस्था संख्या अनिष्ट तफावत रक्कम

० ते १० लाखांपर्यंत ६३ ३२९.७२

१० ते २५ लाखांपर्यंत ९५ १,५३७.०२

२५ ते ५९ लाखांपर्यंत १०४ ३,७३०.३२

५० ते ७५ लाखांपर्यंत ५८ ३,६०१.७५

७५ ते १०० लाखांपर्यंत ५३ ४,७०८.५३

१ कोटीपेक्षा जास्त १८० ४६,६०३.३२

एकूण ५५३ ६०,५१०.६६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com