डॉ. मेघा जगताप डॉ. विलास खर्गखराटे डॉ. खिजर बेगSustainable Agriculture: कोरडा दुष्काळ, अतिवृष्टी अशा परिस्थितीत खरीप हंगामात योग्य आंतरपीक पद्धतीचा अवलंब फायदेशीर ठरतो. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यास कमी कालावधीत येणाऱ्या आंतरपिकांच्या लागवडीतून हमखास उत्पादन मिळून आर्थिक जोखीम कमी होऊ शकते..यावर्षी ‘एल-निनो’स्थिती असल्याने नैर्ऋत्य मॉन्सूनवर त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. सर्वच ‘एल निनो’ वर्ष ही दुष्काळी असतातच असे नाही, परंतु पावसाची अनिश्चितता व खंड वाढण्याची शक्यता असते. भारतीय शेती मॉन्सूनवर विसंबून असल्याने असमान पर्जन्यवृष्टी, पावसातील खंड कमी कालावधीत जास्त पाऊस अशा स्थितीचा खरीप हंगामातील पिकांवर परिणाम होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर हमखास उत्पादन व उत्पन्न मिळविण्यासाठी सुरुवातीपासूनच योग्य पीक नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामध्ये कमी कालावधीत येणाऱ्या वाणांची निवड, योग्य पीक पद्धती, योग्य आंतरपीक पद्धती, जल-मृदसंधारण उपाय, सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाचा अवलंब, तण व्यवस्थापन, संतुलित अन्नद्रव्ये व्यवस्थापन आदी बाबींचे काटेकोर नियोजन करायला हवे. कोरडा दुष्काळ, अतिवृष्टी अशा परिस्थितीत खरीप हंगामातील उत्पादन आणि आर्थिक उत्पन्न अधिक शाश्वत बनविण्यासाठी आंतरपीक पद्धतीचा अवलंब फायदेशीर ठरतो..Fodder Intercropping: चारा पिकात आंतरपीक फायदेशीर, जोखीम कमी आणि पोषण जास्त.योग्य आंतरपिकाची निवडकमी पाऊसमानाच्या परिस्थितीत कमी कालावधीत तयार होणारी पिके जसे मूग, उडीद ही जास्त फायदेशीर ठरतात. अधिक पाऊसमानाच्या परिस्थितीत जमिनीवर पसरून वाढणारी, कमी उंचीची आंतरपिके घेतल्यास जमिनीची धूप कमी होते. तसेच आंतरपिकाच्या पसरलेल्या मुळांमुळे पाण्याचा निचरा लवकर होऊन जमीन लवकर वापसा स्थितीत येते.हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये नत्र स्थिरीकरण करणारी पिके जसे भुईमूग, मूग, उडीद, सोयाबीन यांचा समावेश आंतरपिकात असावा. त्यामुळे जमिनीची सुपीकता आणि जमिनीतील सूक्ष्म जीवसृष्टीवर अनुकूल परिणाम होतो..मुख्य पीक व आंतरपीक यांची निवड करताना त्यांची मुळे ही जमिनीच्या वेगवेगळ्या थरांमध्ये वाढणारी किंवा पसरणारी असावीत. जसे कपाशीचे सोट मूळ मातीच्या खालच्या थरातून अन्नद्रव्ये पाणी शोषून घेते, तर आंतरपीक मूग किंवा उडीद यांची तंतुमय मुळे जमिनीच्या वरच्या थरातून अन्नद्रव्ये आणि पाणी शोषून घेतात.मुख्य पीक आणि आंतरपीक हे एकमेकांसोबत जमीन, हवा, सूर्यप्रकाश, पाणी, अन्नद्रव्ये इत्यादींसाठी स्पर्धा करणारे नसावे. मुख्य पीक आणि आंतरपीक एकमेकांना पूरक असावे.आंतरपीक म्हणून खादाड पिके जसे सूर्यफूल, मका यांचा समावेश टाळावा..जमिनीच्या प्रकारानुसार वाण निवडसोयाबीनहलकी जमीन ः जेएस-३३५, एम.ए.यू.एस.-७१. एम.ए.यू.एस.६१२ (हलक्या जमिनीत एम.ए.यू.एस-१६२ आणि केडीएस-७२६ सारख्या लांब कालावधीच्या जाती घेणे टाळावे.)मध्यम ते भारी जमीन ः एम.ए.यू.एस.-६१२, एम.ए.यू.एस.१५८, एम.ए.यू.एस.-७१, डी.एस-२२८, केडीएस-७५३, फुले किमया केडीएस-९९२, एमएसीएस-१४६०, एम.ए.यू.एस.-७२५यंत्राने काढण्यास उपयुक्त ः भारी जमीन व पावसाच्या खंडा दरम्यान १ ते २ पाणी देण्याची व्यवस्था असेल तर एम.ए.यू.एस.-१६२टोकण पद्धतीने लागवड ः केडीएस-७५३ फुले किमया, केडीएस-९९२, एम.ए.यू.एस.-६१२.तूरमध्यम जमीन किंवा कोरडवाहू जमिनीसाठी लवकर तयार होणारे वाण ः बीडीएन ७११ (१५० ते १५५ दिवस), बीडीएन ७०८ (१६० ते १६५ दिवस), विपुला (१४५-१६० दिवस)भारी जमिनीसाठी किंवा बागायती लागवडीसाठी ः बीएसएमआर ७३६ (१७५-१८० दिवस) व बीएसएमआर ८५३ (१७०-१८० दिवस).अधिक आर्थिक परतावा देणाऱ्या आंतरपीक पद्धती.Inter Cropping: कमी पावसात आंतरपीक फायदेशीर; आंतरपिकाचे ७ बेस्ट पर्याय.१) ज्वारी + तूरही आंतरपीक पद्धती ३ः३ किंवा ४:२ ओळीच्या प्रमाणात शिफारस आहे. ज्वारी आणि तूर ही दोन्ही पिके एकमेकांस पूरक ठरतात. ज्वारीचे पीक ११० ते ११५ दिवसांत निघून गेल्यावर ज्वारीच्या पाटातील ओलावा, अन्नद्रव्ये तुरीच्या पिकास गरजेनुरूप उपलब्ध होतो.मोकळी हवा, सूर्यप्रकाश यामुळे तुरीच्या सलग पिकापेक्षाही (निखुळ्या तुरीपेक्षा) आंतर पीक पद्धतीतील तूर पीक अधिक जोमदार येते.ज्वारी+तूर ही एक स्वयंचलित फेरपालट होणारी आंतरपीक पद्धती असून, एकाच शेतामध्ये गरज पडल्यास २ ते ३ वर्षे यांचे उत्पादन घेता येते. मात्र असे करताना दुसऱ्या वर्षी ज्वारीच्या ओळीच्या क्षेत्रावर तुरीच्या ओळी पेरल्या जातील याची दक्षता घेणे जरुरीचे असते..२) बाजरी + तूर (३:३)कमी पावसाचा भाग मध्यम जमिनी तथा उशिरा पेरणीसाठी या आंतरपीक पद्धतीची शिफारस आहे..३) कापूस + उडीद (१:१) किंवाकापूस + मूग (१:१)हमखास पावसाचा प्रदेश, मध्यम ते भारी जमिनीसाठी शिफारस.कापसाच्या अमेरिकन संकरित (बीटी) आणि सरळ वाण (देशी कपाशी) यांच्यासाठी ९० बाय ९० आणि ९० बाय ६० सेंमी अंतरावर कापसाच्या दोन ओळी टोकन करून मध्ये उडदाचे आंतरपीक घ्यावे.रासायनिक खतांच्या नियोजनात कापसाची शिफारशीत पूर्ण मात्रा (बीटीसाठी १००:५०:५०, देशी वाणासाठी ८०:४०:४० बागायती कपाशीसाठी १५०:७५:७५) विभागून द्यावी. सोबतच २५ टक्के आंतरपिकाची खताची मात्रा मिळवून ही पूर्ण मात्रा कापूस उडीद / कापूस मग या आंतरपीक पद्धतीमध्ये वापरावी.उडदासारखेच मुगाची एक ओळ कापसाच्या दोन ओळींतील अंतरामध्ये घेण्याची शिफारस आहे..४) कापूस + सोयाबीन (१:१)थोडा सखोल भाग असलेल्या भारी जमिनीमध्ये कापूस अधिक सोयाबीन ही आंतरपिके घ्यावीत.सोयाबीनच्या लवकर पक्व होणाऱ्या वाणांची जसे एमएयूएस ७१ यांची निवड करावी. उशिराने तयार होणाऱ्या वाणांची निवड आंतरपीक म्हणून करू नये.सोयाबीन जलद वाढणारे आणि खादाड पीक असल्याने खते देताना शिफारशीत मात्रेच्या ८० टक्के मात्रा ही कापसाच्या ओळीत द्यावी. यामुळे सोयाबीन पिकाच्या जलद वाढीचा कापसाच्या वाढीवर विपरीत परिणाम न होता, कापसाची वाढही चांगल्या प्रकारे होते..५) सोयाबीन + तूर (४:२)मध्यम जमिनीत, हमखास पावसाच्या प्रदेशात तसेच उशिरा पेरणीसाठी योग्य आंतरपीक पद्धती.सोयाबीन + तूर आंतरपीक पद्धतीचे सोयाबीन तुल्यबळ उत्पादन हे २१.६७ क्विंटल प्रति हेक्टर येते, या उलट केवळ सोयाबीन हेच एक पीक घेतल्यास हेक्टरी १३.१८ क्विंटल उतारा येतो..६) मका + सोयाबीन (२:२)मक्याची पट्टा पद्धतीने (७५ ते ४५ सेंमी) लागवड करताना दोन पट्ट्यातील अंतरामध्ये (७५ सेंमी) सोयाबीनच्या २ ओळी पेरून घ्याव्यात..७) मका + मूग (१:१)मक्याची ६० बाय ३० सेंमी अंतरावर पेरणी करून मक्याच्या दोन ओळींमध्ये एक मुगाची ओळ पेरावी.- डॉ. मेघा जगताप ७५८८५७१०५५(लेखक कृषिविद्या विभाग, कृषी महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे कार्यरत आहेत ).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.