Integrated Farming System
Integrated Farming SystemAgrowon

Integrated Farming System : एकात्मिक कोरडवाहू शेतीचे मॉडेल विकसित

Agriculture Integrated Model Developed : विभक्‍त कुटुंब पद्धतीमुळे कमाल जमीनधारणा सातत्याने कमी होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शेती हा शाश्‍वत उत्पन्नाचा स्रोत असावा या हेतूने ‘सीआयसीआर’ने एक हेक्‍टरसाठीचे एकात्मिक शेती पद्धतीची संकल्पना मांडली आहे.
Published on

Nagpur News : केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने मध्य भारतातील कोरडवाहू शेतीकरिता एकात्मिक व्यवस्थापनाचे एक हेक्‍टरचे मॉडेल विकसित केले आहे. २०१७ ते २०२१ या कालावधीत त्याकरिता प्रक्षेत्रावर विविध प्रकारच्या चाचण्या घेत अभ्यास करण्यात आला. त्याआधारे हे मॉडेल शिफारशीत करण्यात आले आहे.

विभक्‍त कुटुंब पद्धतीमुळे कमाल जमीनधारणा सातत्याने कमी होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शेती हा शाश्‍वत उत्पन्नाचा स्रोत असावा या हेतूने ‘सीआयसीआर’ने एक हेक्‍टरसाठीचे एकात्मिक शेती पद्धतीची संकल्पना मांडली आहे. अभ्यासानुसार कापसात तुरीचे आंतरपीक घेण्यात आले.६ः२ असा आंतरपीक पद्धतीचा अंतर्भाव होता. यातून ८२३ किलो कापूस तर तुरीची १५२ किलो उत्पादकता मिळाली. दुसऱ्या एक एकर क्षेत्रावर खरिपात सोयाबीन लागवड होती. त्यातून ८६४ किलोचा उतारा मिळाला.

Integrated Farming System
Integrated Farming System : एकात्मिक शेती पद्धतीचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा

सोयाबीन काढणीनंतर रब्बी हंगामात हरभरा व त्यात मोहरीचे मिश्र पीक अशी शिफारस आहे. हरभऱ्याची उत्पादकता १०६० किलो तर मोहरीची ७५ किलो इतकी मिळाली. उर्वरित अर्धा एकर क्षेत्रात शेळीपालन, चारा लागवड, शेततळे, परसातील कुक्‍कुटपालन या करिता वापरण्यात आले आहे. काही क्षेत्रात फळपिके व ती मोठी होईपर्यंत त्यात विविध आंतरपिकेही फायदेशीर ठरतात.

त्यासोबतच भाजीपाला पिकेही घेता येतील. शेळीपालनासाठी ९ शेळ्या व एक बोकुड तर कुक्कुटपालनाकरिता १०० पक्ष्याची बॅच शिफारशीत आहे. वर्षभरात दोन बॅचेस मिळतील. वनराज किंवा इतर कुक्‍कुट पक्ष्यांचे संगोपन मांसलकामी व्हावे असे अपेक्षित आहे. यातून वर्षाला सरासरी ६५ हजार ६१४ रुपयांचे उत्पन्न होईल. शेळीपालनातून १५,८१२ रुपयांचे निव्वळ उत्पन्न होणार आहे. पिकांपासून मिळणारे उत्पन्न हे अतिरिक्‍त ठरणार असून बाजारदरात सातत्याने स्थित्यंतर होत असल्याने त्याचा खर्च आणि नफाही बदलता राहतो. यातून वर्षभरात ३०२० किलो खाद्य, १५९० किलो चारा, २.५० टन खत तयार करण्यात आले. त्याचा निविष्ठा म्हणून वापर होणार आहे.

Integrated Farming System
Integrated Farming : माळरानावर प्रयोगशील, एकात्मिक शेती

संरक्षित सिंचनाचा पर्याय

सिंचनाच्या सोयी मर्यादित असल्याने या मॉडेलमध्ये शेततळ्याची शिफारस आहे. २ मीटर खोल तर ३० बाय ३० मीटर आकाराचे शेततळे खोदल्यास पावसाळ्यात त्यात पाणी साचेल. त्याचा उपयोग पिकासाठी गरजेच्यावेळी करता येणार आहे.

मध्य भारतात त्यातही मुख्यत्वे विदर्भासाठी ‘आएफएस मॉडेल’ प्रभावी ठरणार आहे. बाजारात मागणी असलेली भाजीपाला पिके यात घेता येतील. संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद यांच्या मार्गदर्शनात या संकल्पनेवर काम करण्यात आले. याला ‘आयसीएसआर’ने देखील मान्यता दिली आहे.
डॉ. रामकृष्णा जी. आय.,वरिष्ठ शास्त्रज्ञ, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com