Crop Insurance Scheme : परभणी जिल्ह्यात ७ खरीप पिकांना विमा योजना लागू

Kharif Season : खरीप हंगाम २०२४ -२५ करिता पंतप्रधान पीकविमा योजना परभणी जिल्ह्यातील सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी या ७ पिकांना लागू आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : खरीप हंगाम २०२४ -२५ करिता पंतप्रधान पीकविमा योजना परभणी जिल्ह्यातील सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी या ७ पिकांना लागू आहे. शेतकऱ्यांना केवळ १ रुपया भरून पीकविमा अर्ज दाखल करता येतील. बँका तसेच सामाईक सुविधा केंद्र (सीएससी), पीकविमा पोर्टलच्या माध्यमातून विमा अर्ज सादर करण्यासाठी सोमवार (१५ जुलै)पर्यंतची अंतिम मुदत आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल गवळी यांनी दिली.

परभणी जिल्ह्यात खरीप हंगामात आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कं. लि. या विमा कंपनीकडून ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग यांसारख्या टाळता न येणाऱ्या जोखमींमुळे पिकांच्या उत्पादनात येणाऱ्या घटीपासून व्यापक विमा संरक्षण मिळणार आहे.

Crop Insurance
Crop Insurance : खरिपासाठी एक रुपयात पीकविमा योजना

पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी सर्वप्रथम ई-पीकपाहणीवर पिकांची नोंद करणे बंधनकारक आहे. परभणी जिल्ह्यातील सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी या अधिसूचित पिकांसाठी अधिसूचित महसूल मंडलातील शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल.

शेतकरी हिश्‍शाची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२४-२५ करिता केवळ १ रुपया भरून पीकविमा पोर्टलवर नोंदणी करता येईल. या योजनेत सहभागी होण्यासाठी संबंधित बँक, पीएमएफबीवाय पोर्टल (https://pmfby.gov.in) वर आपले सरकार केंद्र (सीएससी) यांच्या मार्फत विमा अर्ज सादर करता येतील. कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेमार्फत अर्ज भरुन देणे आवश्यक आहे.

Crop Insurance
Crop Insurance : शेतकऱ्यांना यंदाही १ रुपयात पीकविमा ; विमा भरण्यास आजपासून सुरूवात

कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी व्हायचे नसेल, तर त्यांनी बँकेस अंतिम मुदतीच्या ७ दिवस आधी लेखी कळविणे आवश्यक आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी कर्जदार व बिगरकर्जदार शेतकऱ्यांसाठी अंतिम मुदत १५ जुलै ही आहे. पीकविमा प्रस्तावासाठी विहित नमुन्यातील अर्ज, आधार कार्ड आधार नोंदणीची प्रत, ७-१२ उतारा, अधिसूचित पिकांचे पेरणी केलेले स्वयंघोषणापत्र, भाडेपट्टा करार असलेल्या शेतकऱ्यांचा करारनामा,

संमतिपत्र, बँक पासबुकची प्रत कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. जास्ती जास्त शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी आयसीआयसीआय लोंबाई जनरल इन्शुरन्स कं. लि., पुणे टोल फ्री क्रमांक १८००१०३७७१२ ई-मेल आयडी customersupportba@icicilombard.com वर ई-मेल करावे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, संबंधित तालुका कृषी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयीकृत बँकांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल गवळी, तंत्राधिकारी (सांख्यिकी) महादेव लोंढे यांनी केले आहे.

जोखीमस्तर ७० टक्केनुसार पीकनिहाय

प्रतिहेक्टरी विमा संरक्षित रक्कम (रुपयांत)

पीक विमा संरक्षित रक्कम

सोयाबीन ५५०००

कापूस ५५०००

तूर ३६८०२

मूग २२०००

उडीद २२०००

ज्वारी २९७५०

बाजरी २५०००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com