Crop Insurance : आंबा पिकाला विम्याचे कवच

Mango Crop Insurance : बदलते हवामान, अवेळी पडणारा पाऊस, तापमान बदलामुळे दरवर्षी आंबा पिकावर त्याचा परिणाम होतो. मोहोर गळणे, मोहोर करपणे, फळगळ होणे अशा समस्या सातत्याने जाणवतात.
Mango
MangoAgrowon
Published on
Updated on

Palghar News : बदलते हवामान, अवेळी पडणारा पाऊस, तापमान बदलामुळे दरवर्षी आंबा पिकावर त्याचा परिणाम होतो. मोहोर गळणे, मोहोर करपणे, फळगळ होणे अशा समस्या सातत्याने जाणवतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातचे उत्पादन जाऊन पूर्ण हंगाम वाया जाऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते.

शेतकऱ्यांच्या या आर्थिक नुकसानीला आळा बसविण्यासाठी पुनर्रचित हवामानावर आधारित आंबा फळपीक विमा योजना सरकारमार्फत राबविण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या आंबा बागेचा विमा ३० नोव्हेंबरपूर्वी उतरवून ती विमा संरक्षित करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा कृषी विभागाने केले आहे.

विमा उतरवण्यासाठी शेतकऱ्यांसाठी १०० झाडांसाठी प्रतिहेक्टरी २१ हजार २५० रुपये विमा हप्ता भरायचा असून विमा संरक्षित रक्कम एक लाख ७० हजार रुपये आहे. प्रति झाड २१२.५० रुपये विमा हप्ता भरावयाचा आहे.

Mango
Horticulture Crop Insurance : केळी विम्याच्या २० हजार अर्जांची पडताळणी होणार; हवामान आधारित फळ पिक विमा योजनेत १.७३ लाख अर्ज दाखल

गारपीटसह ज्या शेतकऱ्यांना विमा उतरवायचा असेल, तर प्रति हेक्टरी दोन हजार ८५० रुपये अधिकचे भरायचे आहेत. त्याची विमा संरक्षित रक्कम ५७ हजार रुपये आहे. शेतकरी आपले खाते असलेल्या राष्ट्रीयकृत, जिल्हा मध्यवर्ती बँकेत अर्ज करून अथवा महा-ई सेवा केंद्रावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून विमा उतरवू शकतात.

कागदपत्रांची गरज

मागील तीन महिन्यांतील आंबा पीक नोंद असलेला सातबारा, आधार कार्ड, बँक पासबुक, स्वयंघोषणापत्र, आंबा बागेसह शेतकऱ्यांचा अक्षांश-रेखांशसह फोटो.

Mango
Crop Insurance Aid : अतिवृष्टीबाधित ८ लाख शेतकरी अर्थसाह्याच्या प्रतीक्षेत

स्वयंचलित हवामान यंत्राचा वापर

सरकारतर्फे प्रत्येक महसूल मंडळनिहाय स्वयंचलित हवामान यंत्र बसवण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही अधिकारी, कर्मचाऱ्याला प्रत्यक्षात आंबा बागेची पाहणी न करता स्वयंचलित हवामान यंत्राद्वारे माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे एकदा ऑनलाइन अर्ज केला की, त्यानंतर पंचनामे केले जाणार नाहीत.

पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा अंतर्गत आंबा पीक विमा उतरविण्यासाठी अंतिम मुदत ३० नोव्हेंबर असून शेतकऱ्यांनी विमा उतरवून बाग संरक्षित करून घ्यावी.
- विश्वास बर्वे, उपविभागीय कृषी अधिकारी, पालघर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com