सहवेदनेतून प्रेरणा

अपंग बांधवांच्या तुलनेत धडधाकट माणसांचे आयुष्य सुखकर असूनही अनेक जण हताश आणि हरलेल्या अवस्थेत जगत असतात. अपंगत्वामुळे आयुष्यात आलेल्या अनेक मर्यादा, पदोपदी येणाऱ्या अडचणी यावर त्यांनी न डगमगता शोधलेले पर्याय, इतरांना जगण्याची उर्मी देत असतात.
मशागत लेख
मशागत लेखAgrowon
Published on
Updated on

अपंग बांधवांच्या तुलनेत धडधाकट माणसांचे आयुष्य सुखकर असूनही अनेक जण हताश आणि हरलेल्या अवस्थेत जगत असतात. अपंगत्वामुळे आयुष्यात आलेल्या अनेक मर्यादा, पदोपदी येणाऱ्या अडचणी यावर त्यांनी न डगमगता शोधलेले पर्याय, इतरांना जगण्याची उर्मी देत असतात. अपंगत्वावर जिद्दीने मात करून स्वाभिमानी आयुष्य जगणारे असे अनेक लोक, इतर धडधाकट लोकांसाठी प्रेरणादायी असतात. प्रत्येकाला नैराश्य येत असते तेही अपंगत्वापेक्षा कमी नसते. असे अपंगत्व ज्यामुळे माणूस निष्क्रिय बनतो. आपली बलस्थाने विसरून जातो. एक प्रेरणा जी संपूर्ण शरीराला ऊर्जा पुरवते कधी कधी ती इतकी क्षीण होते की अगदी मजबूत धडधाकट असून सुद्धा माणसाची अपंगाप्रमाणे अवस्था होते. नवनिर्मितीची धडाडी संपते. समोर रस्ता असून पाऊल उचलायला मन धजवत नाही.

डोक्यात नकारात्मक विचारांचे काहूर घोंघावत राहते. कृती शून्य अवस्था निर्माण होते. हे अपंगत्व कधी काही तासापुरते, काही दिवसांपुरते असते. तर काहींना यातून बाहेर पडण्याचा शेवटपर्यंत मार्ग सापडत नाही. यातून सुटका करून घेण्यासाठी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल गाठले जाते.

कित्येक धडधाकट लोक निराश दिसतात. अपयशाचे पाढे वाचत नशिबाला दोष देत, नकारात्मक विचारांनी गांजून गेलेले असतात..ज्याला स्वाभिमानाने जगायचेय, देह अपंग असला तरी ज्यांचे मन अभंग आहे. अशी शेकडो उदाहरणे आजूबाजूला असतात. असाच एक दरवान यादव नावाचा युवक शेकडो मैल दूर बिहार राज्यातून कष्टाच्या भाकरीवर स्वाभिमानाने पोट भरण्यासाठी आमच्या इथे आला. त्याला एकच हात आहे आणि तो सुद्धा डावा!

एकाच हाताने इमारत बांधकामाची सगळी कामे तो अगदी सहजपणे करतो. जिथे उंच ठिकाणी आपल्याला दोन्ही हाताने आधार घेतला तरी भीती वाटते अशा उंचीवरची जड कामे तो कौशल्याने करतो. त्याची कामाची पद्धत आणि झपाटलेपण पाहून हातापायाने धड असणारा कुणीही भारावून जाईल. अशा लोकांकडे बघितले, की वाटते जीवनात अशक्य काहीच नाही.

उठसूट सबब सांगणाऱ्यांनी अशा जिद्दी लोकांकडून आदर्श घेतला पाहिजे. नैराश्य हा आयुष्यातला सर्वांत मोठा अडथळा आहे. तो वेळीच ओळखून वेळ न दवडता नैराश्य झटकून द्यायला हवे. नैराश्य आलेच तर आयुष्याची लढाई जिद्दीने लढणारे अपंग बांधव आठवून बघा. नियतीने त्यांच्याकडून काही हिरावून घेतलेले असले तरी ते हरलेले नसतात. शक्य असेल तर त्यांच्या संपर्कात राहा त्यांच्याशी मैत्रीचा हात पुढे करा. दोघांनाही सहवेदनेतून प्रेरणा मिळून जगण्याच्या लढाईला आणखी बळ मिळेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com