Crop Damage : दक्षिण सोलापुरातील नुकसानग्रस्त पिकांची अधिकाऱ्यांकडून पाहणी

Unseasonal Rain : अवेळी आलेल्या पावसामुळे सेटिंग अवस्थेत असणाऱ्या द्राक्ष बागा, काढणीस आलेल्या तुरी तसेच नुकत्याच पेरलेल्या ज्वारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Solapur News : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अवेळी आलेल्या पावसामुळे सेटिंग अवस्थेत असणाऱ्या द्राक्ष बागा, काढणीस आलेल्या तुरी तसेच नुकत्याच पेरलेल्या ज्वारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान हे दक्षिण सोलापूर तालुक्यात झाले. त्यातही बोरामणी मंडलात ते अधिक झाले, या नुकसानीची पाहणी नुकतीच आमदार, प्रातांधिकारी आणि तहसीलदारांकडून करण्यात आली.

Crop Damage
Crop Damage Survey : ठरावीक शेतकऱ्यांचेच पंचनामे

एकीकडे सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना दुसरीकडे अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत.

Crop Damage
Crop Damage : ‘मॉन्सूनोत्तर’ने बीडमध्ये २८६ हेक्टर पिकांचे नुकसान

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनीही आपल्या मतदारसंघातील बोरामणी भागात जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. या पाहणी दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर देत, प्रशासनाला तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सूचना देखील दिल्या.

या नागरिकांना राज्य सरकाकडून शक्य तेवढी मदत मिळवून देण्यासाठी मी या तालुक्याचा आमदार म्हणून प्रयत्नशील असल्याचे सांगितले. त्यांच्यासह प्रांताधिकारी विठ्ठल उदमले आणि तहसीलदार किरण जमदाडे यांनीही कासेगाव भागातील नुकसान झालेल्या द्राक्ष बागा व इतर पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधून, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com