Agriculture Commissioner Sunil Chavan : शीतगृहांची कृषी आयुक्तांकडून पाहणी

राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यातील शीतगृह उद्योगांना भेटी देऊन या उद्योगांमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठीचे मार्गदर्शन केले.
Sunil Chavan
Sunil ChavanAgrowon
Published on: 
Updated on: 

Satara Agriculture News : राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण (Agriculture Commissioner Sunil Chavan) यांनी जिल्ह्यातील शीतगृह उद्योगांना भेटी देऊन या उद्योगांमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठीचे मार्गदर्शन केले.

सुनील चव्‍हाण यांनी भेटीदरम्‍यान सातारा एमआयडीसीतील भंडारी ॲग्रो इंडस्ट्रीज, खंडाळा येथील ज्योती कदम यांच्या शीतगृहाची पाहणी केली. त्यांनी शीतगृह व्यवसाय, साठवणूक करण्यात आलेल्या शेतमालाविषयीची माहिती घेतली.

Sunil Chavan
Sunil Chavan : शेतकऱ्यांसाठी आम्ही उत्तम काम करून दाखवू

यानंतर त्‍यांनी मेगा फूड पार्कला भेट देत त्‍याचे उपाध्‍यक्ष विजयकुमार चोले यांच्याशी चर्चा केली. शेतकरी उत्पादक कंपन्यांना जोडण्याबाबत, शेतकरी उत्पादक कंपन्यांना फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योग करण्याच्‍या अनुषंगाने सुनील चव्‍हाण यांनी विजयकुमार चोले यांच्‍याशी चर्चा केली.

या वेळी विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे, कृषी विकास अधिकारी विजय माईणकर, विभागीय कृषी अधिकारी बापूसाहेब शेळके, सातारा तालुका कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ, खंडाळा तालुका कृषी अधिकारी गजानन ननावरे आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com