Krishi Seva kendra : कृषी सेवा केंद्रांची तपासणी करून दोषींवर तत्काळ कार्यवाही करा

Agriculture Inputs : कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून खताचा तुटवडा भासवून अडवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे.
Kharif Season
Kharif SeasonAgrowon

Hingoli News : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रासायनिक खते, बी-बियाणे आणि इतर कृषी निविष्ठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात. कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून खताचा तुटवडा भासवून अडवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे.

त्यामुळे जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने भरारी पथकांमार्फत अशा कृषी केंद्रांची तपासणी करून दोषींवर तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित यंत्रणेला येथे दिले.

Kharif Season
Agriculture Input Sale Center : पंधरा कृषी निविष्ठा विक्री केंद्रांचे परवाने निलंबित

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात शुक्रवारी (ता. २१) आयोजित जिल्हा नियोजन समिती, खरीप हंगाम, पाणीटंचाई, पर्जन्यमान, दुष्काळ आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार सर्वश्री. विप्लव बाजोरिया, तानाजी मुटकुळे, संतोष बांगर, राजू नवघरे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सत्तार म्हणाले, की जिल्ह्यातील ३० मंडलांपैकी केवळ ९ मंडलांतच समाधानकारक पाऊस झालेला आहे. जिल्ह्यात ३२.३० टक्केच पेरण्या झालेल्या आहेत. पुरेसा पाऊस पडेपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. जिल्ह्यात सध्या केवळ ५२ टक्केच खताचा पुरवठा झालेला आहे. उर्वरित ४८ टक्के खताच्या मागणीचा प्रस्ताव तत्काळ द्यावा.

Kharif Season
Agricultural Input Sellers : नगर जिल्ह्यात ४२ कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर कारवाई

शेतकऱ्यांना कुठल्याही खत, बियाण्याचा तुटवडा भासणार नाही याची दक्षता घ्यावी. कमी पावसामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे झालेले नुकसान व भविष्यात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी व शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. २०२३-२४ चा पीकविमा शंभर टक्के मिळाला पाहिजे.

प्रलंबित राहण्याची कारणे शोधून पीकविम्यापासून वंचित शेतकऱ्यांना पीकविमा मिळवून द्यावा. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्व बँकांनी खरीप पीककर्जाचे शंभर टक्के वाटप करावे. पीककर्ज न देणाऱ्या बँकांवर कारवाई करावी. कृषिपंपांना वीजपुरवठा व ट्रॉन्स्फॉर्मरबाबत अडवणूक होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. शेतकऱ्यांना ७२ तासांत ट्रान्स्फॉर्मर उपलब्ध करून द्यावेत. ट्रान्स्फॉर्मर बसविण्यासाठी शेतकऱ्यांना वीजबिलाच्या वसुलीची सक्ती करू नये, असे निर्देश त्यांनी दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com