Health Institute Adoption : दर्जेदार उपचारांसाठी ‘दत्तक आरोग्य संस्था’ योजना

Health Department : सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत मोठ्या प्रमाणावर गट ‘अ’ व ‘ब’ तसेच विशेषज्ञ संवर्गातील वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत.
Government Hospital
Government Hospital Agrowon
Published on
Updated on

Amaravati News : सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्या, यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना आरोग्य संस्था दत्तक देण्याची आगळीवेगळी संकल्पना राबविण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत मोठ्या प्रमाणावर गट ‘अ’ व ‘ब’ तसेच विशेषज्ञ संवर्गातील वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. प्रशासकीय बाब म्हणून राज्यातील विविध ठिकाणी त्यांच्या पदस्थापना, पदोन्नती होत असतात. वैद्यकीय अधिकारी आपल्या सेवाकाळात एकापेक्षा अधिक ठिकाणी सेवा बजावतात, पण अधिकारी पहिल्यांदा जिथे नोकरीला लागतात त्या जागेविषयी वेगळी अन् आपलेपणाची भावना मनात असते.

Government Hospital
Health Department Recruitment : आरोग्‍य केंद्रांना रिक्‍त पदांचे ग्रहण

हाच धागा पकडून पहिल्या नोकरीचे ठिकाण अधिकाऱ्यांनी दत्तक घेतले तर त्या आरोग्यकेंद्र, रुग्णालयात गुणात्मक बदल अधिकारी घडवून आणू शकतील हा विचार आरोग्यमंत्री यांनी मांडला आणि तो यशस्वी करण्यासाठी राज्यभर ही आगळीवेगळी संकल्पना राबविण्यात येणार आहे.

दत्तक घेतलेल्या आरोग्य केंद्रांमध्ये आहारसेवा कशी आहे, नियमित प्रशिक्षण दिले जाते का, आरोग्य केंद्राच्या इमारतीची अवस्था कशी आहे, रुग्णवाहिका उपलब्ध आहे का, बायोमेडिकल वेस्टची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जाते की नाही, प्रसूती वॉर्ड, ऑपरेशन थिएटरची स्थिती कशी आहे, लसीकरण नियमित होते का, अग्निशमन उपकरणांची स्थिती, प्रसाधनगृहांची स्थिती, बायोमेट्रिक हजेरीनुसार कर्मचाऱ्यांचे वेतन होते का, याकडेही अधिकाऱ्यांना लक्ष द्यावे लागणार आहे.

Government Hospital
Health Department : देशाच्या विकासात आरोग्य विभागाचे भरीव योगदान

पहिल्या टप्प्यात जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य उपसंचालक व सहसंचालक दर्जाचे अधिकारी आरोग्यकेंद्रे दत्तक घेतील. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांना ही जबाबदारी दिली जाईल. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांची ही संकल्पना वैद्यकीय अधिकारी किती यशस्वी करतात, याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

पहिल्या नोकरीचे महत्त्व वेगळे असते. त्या जागेशी अनेकांचे जिव्हाळ्याचे संबंध बरीच वर्षे कायम राहतात. त्याचा उपयोग करण्याचे आम्ही ठरविले आहे. आपल्या नोकरीच्या जागेव्यतिरिक्त आणखी एका ठिकाणी चांगली सेवा देण्याची संधी यानिमित्ताने अधिकाऱ्यांना मिळणार आहे.
-प्रकाश आबिटकर, आरोग्यमंत्री

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com