Cotton Shredder : कापूस पऱ्हाट्या बारीक करण्यासाठी कॉटन श्रेडर

Agricultural Equipment : सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकरी व्ही-पासच्या साह्याने कापसाच्या पऱ्हाटी मुळापासून काढून, त्यानंतर मजुरांच्या साह्याने ही पऱ्हाटी एकत्र करून पेटवतात किंवा बांधावर ढीग लावतात.
Cotton Farming
Cotton FarmingAgrowon
Published on
Updated on

नवल तराळे

Agricultural Equipment : सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकरी व्ही-पासच्या साह्याने कापसाच्या पऱ्हाटी मुळापासून काढून, त्यानंतर मजुरांच्या साह्याने ही पऱ्हाटी एकत्र करून पेटवतात किंवा बांधावर ढीग लावतात. त्याऐवजी पऱ्हाटी कापणीसाठी कॉटन श्रेडर यंत्राचा वापर फायदेशीर ठरतो. कॉटन श्रेडर हे यंत्र कापसाची वेचणी पूर्ण झाल्यानंतर पिकांच्या अवशेषाचा भुगा बनवण्यासाठी उपयोगी ठरते.

...असे आहे यंत्र

कॉटन श्रेडरमध्ये प्रथमतः फीडिंग सिस्टीममध्ये पऱ्हाटी कापण्यासाठी डिस्क कटरसह दोन फिडर ड्रम आणि दोन प्रेशर रोलर ड्रम आहेत. त्यात अवशेष ओढून पुढे ढकलण्यासाठी एक स्प्रिंग लोडेड स्विंग प्रकारही उपलब्ध आहे.

या श्रेडरमध्ये सहा ब्लेड असलेले फ्लायव्हील असून ते १६०० फेरे प्रति मिनिट या वेगाने फिरते. फ्लायव्हीलच्या परीघारावर बसवलेले पॅडल कापलेल्या पीक अवशेषाच्या भुग्याला अतिरिक्त लिफ्ट देतात. तो भुगा शेतात समप्रमाणात पसरवला जातो.

Cotton Farming
Agriculture Technology : पऱ्हाटी व्यवस्थापनासाठी श्रेडर!

कॉटन श्रेडर यंत्रासाठी ड्युअल क्लचसह ४५ अश्वशक्ती क्षमतेच्या ट्रॅक्टरची आवश्यकता लागते. ३ पॉइंट लिंकेजला जोडून आणि ड्राईव्ह शाफ्टद्वारे ५४० किंवा १००० आरपीएम सह चालविला जाऊ शकतो. ४ ते ५ लिटर डिझेलमध्ये दीड ते दोन तासांत एक एकर कापसाचे क्षेत्रातील अवशेषांचा भुगा करता येतो.

Cotton Farming
Cotton Procurement : ‘सीसीआय’ची तीन लाख क्विंटल कापूस खरेदी

यंत्राचे फायदे

कॉटन श्रेडर या यंत्राच्या साह्याने कमी इंधनामध्ये पऱ्हाटीचा भुगा केला जातो. हेक्टरी दोन टन पऱ्हाटीचा भुगा जमिनीत मिसळल्यास १२.४ ते २० किलो नत्र, १.६ किलो स्फुरद आणि १२.२ ते १३.६ किलो पालाश मिळू शकतो.

पऱ्हाटीचा भुसा जमिनीत गाडल्यानंतर जमिनीची सुपीकता आणि पाणी धारण क्षमता वाढते.

पऱ्हाटीचा भुगा केला जात असल्यामुळे त्यातील विविध किडींच्या सुप्ताव्यवस्था नष्ट होते.

भुग्याचा वापर नैसर्गिक आच्छादनाप्रमाणे विविध पिकामध्ये करता येते. त्यामुळे मातीची धूप कमी करणे, मातीचे तापमान नियंत्रित करणे आणि विघटनानंतर मातीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते.

भुग्याचा वापर लगदा, कागद आणि अळिंबी उत्पादनासाठी होतो.

कॉटन श्रेडर या यंत्राद्वारे शेतातील पऱ्हाटी कापण्यासाठीचा खर्च हा पारंपारिक पद्धतीपेक्षा कमी येतो. पारंपारिक पद्धतीमध्ये खर्च व वेळ जास्त लागतो परंतु, कॉटन श्रेडर यंत्राचा वापर केल्यास खर्च पण कमी लागतो आणि वेळेची सुद्धा बचत होते.

नवल तराळे, ९५१८७७५३७९

(वरिष्ठ तांत्रिकी साहाय्यक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com