Cotton Procurement : ‘सीसीआय’ची तीन लाख क्विंटल कापूस खरेदी

Cotton Market : गेल्या काही महिन्यांपासून कापसाचे दर वाढलेले नाहीत. यामुळे हमीभाव केंद्रावरच शेतकरी कापूस विक्रीसाठी आणताना दिसत आहेत. यामुळेच आतापर्यंत सीसीआयने जिल्ह्यात तब्बल तीन लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे.
Cotton Market
Cotton MarketAgrowon
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा

Yavatmal News : यवतमाळ : गेल्या काही महिन्यांपासून कापसाचे दर वाढलेले नाहीत. यामुळे हमीभाव केंद्रावरच शेतकरी कापूस विक्रीसाठी आणताना दिसत आहेत. यामुळेच आतापर्यंत सीसीआयने जिल्ह्यात तब्बल तीन लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. दर वाढण्याऐवजी कमी झाल्याने शेतकऱ्यांनी कापसाची विकी थांबविली होती. मात्र, दरवाढीची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी बाहेर काढला.

ग्रामीण भागात यावर्षी कापसाच्या उत्पादनात निम्म्याने घट झाली आहे. कापसाचे दर खाली आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची विक्री थांबविली होती. मात्र, दर वाढण्याची शक्यता दिसत नसल्याने शेतकरी आता हमीभाव केंद्राकडे वळला आहे. शेतकरी सीसीआय केंद्रावर कापूस विक्रीसाठी जात असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे.

Cotton Market
Cotton Procurement : परभणी, हिंगोलीत १५ लाख १८ हजार क्विंटल कापूस खरेदी

खरीप हंगामाच्या सुरुवातीला बोगस बियाणे व रासायनिक खतांचा तुटवडा या अडचणींचा सामना करीत कापूस लागवड झाली होती. कापसाचे पीक जोमात असताना पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना फटका बसला होता. त्यामुळे कापसाचे उत्पादन निम्म्याने घटले असून, शेतकरी अडचणीत सापडले आहेत. दर घसरल्याने बाजारात विक्रीला येणाऱ्या कापसाची आवक मंदावली होती. कापसाचे दर हमीभावाच्या पुढे सरकले नाहीत.

त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता. दर कोसळल्याने शेतकऱ्यांनी कापूस विकण्याऐवजी घरात साठवणुकीचा निर्णय घेतला. आता दरवाढीची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी बाहेर काढला आहे. कापूस उत्पादनात झालेला तोटा भाव वाढल्यास भरून निघेल, या आशेवर शेतकरी आहेत.

१२ डिसेंबरपर्यंतच सीसीआयची खरेदी (क्विटंलमध्ये)

यवतमाळ १५,९२७

दारव्हा १८,६२१

दिग्रस २९,२५७

घाटंजी ३७,२२१

कळंब ३,३१९

खैरी २१,२९६

महागाव २,००५

मुकुटबन २१,२१२

पांढरकवडा ४१,९३२

पुसद १६,१६७

राळेगाव ९२८

शिंदोला १५,६०९

वणी ६७,१९८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com