Agriculture Update : नावीन्यपूर्ण शेतीची कास धरावी : अनिल जैन

Vice Chairman of Jain Irrigation Anil Jain : नावीण्यपूर्ण प्रयोग करून शेतीतून समृद्धी आणि प्रतिष्ठा मिळते. २०४७ पर्यंत भारत विकसित देश बनेल व त्यासाठी कृषी क्षेत्र अत्यंत मोलाची भूमिका बजावेल,
Vice Chairman of Jain Irrigation Anil Jain
Vice Chairman of Jain Irrigation Anil Jain Agrowon

Jalgaon News : नावीण्यपूर्ण प्रयोग करून शेतीतून समृद्धी आणि प्रतिष्ठा मिळते. २०४७ पर्यंत भारत विकसित देश बनेल व त्यासाठी कृषी क्षेत्र अत्यंत मोलाची भूमिका बजावेल, असे मत ‘फाली’चे चेअरमन तथा जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी व्यक्त केले.

Vice Chairman of Jain Irrigation Anil Jain
Agriculture Irrigation : ठिबक सिंचनाशिवाय पर्याय नाही

‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (फाली) या उपक्रमांतर्गत तिसऱ्या टप्प्यातील समारोपाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात जैन बोलत होते. व्यासपीठावर ‘फाली’च्या उपाध्यक्षा नॅन्सी बॅरी, सहभागी कंपन्यांचे प्रतिनिधी अजय तुरकने, सुचेत माळी, डॉ. शविंदर कुमार, मयूर राजवाडे, अजिंक्य तांदळे, जयंत चॅटर्जी, प्रवीण कासट आणि राजकुमार, डॉ. समीर मुरली, गौतम पात्रो,

डॉ. दिलीप चौधरी, जैन इरिगेशनचे डॉ. बी. के. यादव, डॉ. प्रकाश पंचभाई आदी उपस्थित होते. अनिल जैन म्हणाले, की शेती क्षेत्रात खूप मूल्यवर्धन करण्याची संधी आहे. शेतीतून सर्वांना अन्न-धान्य प्राप्त होते, परंतु सौंदर्य प्रसाधने जरी बनवायची असतील तरी त्यासाठी फळे, फुले लागतात. शेतीमध्ये प्रामाणिक कार्य केले तर तुमची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. नॅन्सी बॅरी यांच्या भाषणाचा अनुवाद फालीच्या मॅनेजर रोहिणी घाडगे यांनी केला. सूत्रसंचालन हर्ष नौटियाल यांनी केले.

Vice Chairman of Jain Irrigation Anil Jain
Agriculture Irrigation : 'शिरसाई'चे दहा दिवसांचे उन्हाळी आवर्तन

बिझनेस प्लॅन प्रेझेंटेशन विजेते

ॲग्रीकल्चरल वेस्ट इको फ्रेंडली बेस्ट, शारदा पवार विद्यानिकेतन, शारदानगर, पुणे (प्रथम), डीओसी ट्रेझर-जनता गर्ल हायस्कूल शेंदुरजन, घाट, जि. अमरावती (द्वितीय), काऊ डंग प्रोडक्ट- सोमेश्वर विद्यालय, मुढाळे, जि. पुणे (तृतीय), पर्पल सेलिब्रेशन- श्री विठ्ठल माध्यमिक अँड ज्युनियर कॉलेज, भिकोबानगर, जि. पुणे (चौथा), व्हेजिटेबल डीहायड्रेशन (नूतन माध्यमिक विद्यालय, किनगावराजा, जि. बुलडाणा (पाचवा) असे विजेते ठरले व त्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

नावीन्यपूर्ण इनोव्हेशन विजेते

सेफ्टी स्टिक - महात्मा गांधी विद्यालय, आष्टा, जि. सांगली (प्रथम), स्मार्ट ॲग्री स्प्रेअर - दानोली हायस्कूल, दानोली, जि. कोल्हापूर (द्वितीय), स्टार्टर चेंबर फॉर बिगिनर्स अँड ऑफ सिझन क्रॉप्स - जयश्री पेरिवाल इंटरनॅशनल हायस्कूल, जयपूर, राजस्थान (तृतीय), एआय बेस्ड सोलार इन्सेक्ट ट्रॅप ॲण्ड फार्म प्रॉटेक्शन सिस्टीम फॉर ॲनिमल- महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, देऊळगावमाळी, जि. बुलडाणा (चौथा), रेन पाइप (एचडीपीई) रॅपर-आदिवासी विकास हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, खजरी, जि. गोंदिया (पाचवा) असे विजेते ठरले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com