Kokan Development : कोकणात पायाभूत सुविधा, नवीन मानकांवर भर

Devendra Fadanvis : कोकणात पायाभूत सुविधा, नवीन मानके तयार करण्यावर शासनाने मोठा भर दिला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Devendra Fadanvis
Devendra Fadanvis Agrowon

Ratnagiri News : फॉरेन्सिकमध्ये राज्याला नंबर एकवर आणणार आहे. बँका, नॉन बँकिंग फायनान्शियल डिस्ट्रीब्युटर, रेग्युलेटर, सोशल साइट्स एकाच प्लॕटफॉर्मवर असतील, सायबर गुन्हा घडला विशेषतः पैशाच्याबाबतीत फ्रॉडची घटना घडली की, तासभरात पैसे थांबवून ते परत मिळतील, असा चांगला प्लॕटफॉर्म करण्याचे काम सुरू आहे.

हा देशातला सर्वोत्तम प्लॕटफॉर्म असणार आहे. यातून सायबर सुरक्षा मिळेल. कोकणात पायाभूत सुविधा, नवीन मानके तयार करण्यावर शासनाने मोठा भर दिला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Devendra Fadanvis
Crop Insurance : कोऱ्या पंचनामा अर्जावर शेतकऱ्यांच्या घेताहेत स्वाक्षऱ्या

पोलीस अधीक्षक कार्यालय व पोलीस वसाहतीच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी (ता. १४) झाले. त्या वेळी ते बोलत होते. सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण, पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे,

Devendra Fadanvis
Agriculture Education : मंथन - कृषी शिक्षण अन् संशोधनाचे

आमदार योगेश कदम, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, किरण सामंत, माजी आमदार प्रमोद जठार, बाळ माने आदी उपस्थित होते.

काजू उत्पादकांना साडेतीनशे कोटी देण्याचा निर्णय

काजू उत्पादकांसाठी साडेतीनशे कोटी देण्याचा निर्णय केला आहे. बचत गटांचे भांडवल दुप्पट केले आहे. महिलांच्या हातांना रोजगार देण्याचे काम, त्यांना सक्षम करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शक्तिवंदनाच्या माध्यमातून केले आहे. जिल्ह्यातील बचत गटांना मिळलेल्या २३५ कोटींमधून महिला अत्यंत वेगाने रोजगारविषयक काम सुरू करतील, त्यातून त्या सक्षम होतील, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com