Smart Tag Animal : कोल्हापूरचे विद्यार्थी हुशार, दुभत्या जनावरांसाठी बनवलं 'स्मार्ट टॅग'

Animal Health : 'डीकेटीई'च्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील विद्यार्थ्यांनी दुभत्या जनावरांच्या आरोग्याची माहिती देण्यासाठी 'स्मार्ट टॅग' बनवला आहे.
Smart Tag Animal
Smart Tag Animalagrowon

Ichalkaranji DKTE Student : इचलकरंजी येथील 'डीकेटीई'च्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील विद्यार्थ्यांनी दुभत्या जनावरांच्या आरोग्याची माहिती देण्यासाठी 'स्मार्ट टॅग' बनवला आहे. या अत्याधुनिक प्रकल्पाच्या डिझाईनमध्ये इंटरनेट ऑफ थिंग अँड क्लाउड बेसड् डाटा लॉगिंगचा वापर केला आहे. त्यामुळे जनावरांच्या शरीराचे तापमान, ऑक्सिजनचे प्रमाण, हार्ट रेट व जनावरांची हालचाल बघण्यासाठी ही कार्यप्रणाली विकसित केलेली आहे.

मैनुदीन मुल्ला, ओम पवार व सिद्दिक इचलकरंजे या विद्यार्थ्यांनी प्रा. व्ही. बी. सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांसाठी 'कॅटल हेल्थ मॉनिटरिंग स्मार्ट टॅग' हा अनोखा प्रकल्प विकसित केलेला आहे.

जनावरांना होणाऱ्या विविध आजारांमुळे दुग्ध उत्पादन कमी होत असते. त्यावर उपाय म्हणून 'डीकेटीई'च्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून जनावरांसाठी आरोग्यदायी प्रकल्प बनवला आहे. प्रकल्पामध्ये एक संक्षिप्त 'स्मार्ट टॅग' बनवला असून तो जनावरांच्या कानांमध्ये बसवता येतो.

त्यामुळे जनावरांची हालचाल, ऑक्सिजन आणि त्यांच्या हृदयाची कार्यता व तापमान हे सर्व घटक या टॅगमुळे प्रत्यक्षपणे शेतकऱ्यांना मोबाईलवर पाहता येते. त्यामुळे संभाव्य आजारपणापासून जनावरांना वाचवता येणे शक्य होणार आहे. वरील घटकांचे मोजमाप करून काही कठीण बाब असेल तर ही कार्यप्रणाली अलार्म व लाईटमार्फत संदेश पाठवते.

Smart Tag Animal
Bribe Case Kolhapur : सातबाऱ्यावर नाव लावण्यासाठी १५ हजारांची मागितली लाच, पंटरला अटक

वरील सर्व घटक इंटरनेट कार्यप्रणालीमुळे क्लाउड सर्व्हरवर स्टोअर होत असल्यामुळे मागील काही दिवसांतील, महिन्यातील, या वर्षातील जनावरांचा डेटा पाहता येतो. त्यामुळे त्यांचे सर्वेक्षण व देखरेख करणे सोपे जाते.

या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे सोलार आणि बॅटरीवर काम करणारी ही प्रणाली आहे. स्मार्ट टॅगची बॅटरी ही सौर ऊर्जेवर चार्ज होऊ शकते. या नावीन्यपूर्ण प्रकल्पाबद्दल 'डीकेटीई'चे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com