Crop Disease Identification App: फोटोवरुन समजणार रोगाची माहिती

आयआयटी भागलपूर ने शोधले रोगाचा प्रादुर्भाव ओळखणारे मोबाईल अॅप
Crop Disease Identification App
Crop Disease Identification AppAgrowon

पिकावर विविध कीड, रोगाचा (Pest, Disease) प्रादुर्भाव होत असतो. कीड रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीड, रोग नेमका कोणता आहे हे ओळखता आले पाहिजे. त्यामुळे त्यावर उपचार करण सोपं होतं आणि होणारे नुकसान टाळता येते.

पिकावरील सामान्यपणे अढळणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव लक्षणावरुन ओळखता येतो. मात्र काही रोग डोळ्याने दिसनाऱ्या लक्षणावरुन ओळखता येत नाहीत. त्यामुळे रोगामुळे होणारे नुकसान रोखता येत नाही.

नुकसान टाळण्यासाठी रोगाचा प्रादुर्भाव योग्य वेळी ओळखणे अत्यंत गरजेचे आहे. आता रोगाचा प्रादुर्भाव एका अॅपद्वारे अगदी काही मिनीटात ओळखने शक्य होणार आहे.

भागलपूर येथील भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) (IIT) आणि बिहार कृषी विद्यापीठ (बीएयू) (BAU) यांनी एकत्रितपणे पिकातील रोग आणि पिकाच्या इतर समस्या ओळखण्यासाठी आणि त्यावर उपाय शोधण्याच्या उद्देशाने 'ई-निरोग' (E-Nirog) हे मोबाइल अॅप (Mobile App.) तयार केले आहे.  

आज काल प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आहे. त्यामुळए सर्वजण स्मार्टफोनचा वापर अगदी सराईतपणे करतात.  याच मोबाईलचा वापर करुन शेतकऱ्यांना आता पीक व्यवस्थापन करता येणार आहे.  

ई-निरोग अॅप मोबाईलमध्ये इंन्स्टॉल केल्यानंतर रोगग्रस्त पिकाचा फोटो काढून फोटो या अॅपमध्ये दिलेल्या ठिकाणी अपलोड करायचा आहे.

Crop Disease Identification App
Citrus Greenig Disease : लिंबूवर्गीय फळपिकांतील ग्रीनिंग रोगाची लक्षणे काय आहेत?

रोगाच्या इतर लक्षणांचा तपशील नोंदवून ही माहिती अपलोड करावी. या माहितीनूसार संबंधीत रोगावरिल उपायांची माहिती व्हॉट्सअॅपद्वारे शेतकऱ्यांपर्यंत त्वरीत पोहोचवली जाईल.

याशिवाय या अॅपच्या माध्यमातून हवामान अंदाज, जमिनीच्या आरोग्याविषय़ीही माहिती मिळू शकेल. 

या अॅपमुळे घरबसल्या पिक व्यवस्थापनाची योग्य माहिती मिळेल त्यामुळे  हे अॅप शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com