Cotton Pest : माजलगावात कपाशीवर माव्याचा प्रादुर्भाव

Crop Damage : माजलगाव तालुका परिसरात खरिप हंगामात झालेल्या २७ हजार ११९ हेक्टरवरील कपाशी पिकांवर काळ्या माव्याचा प्रादुर्भाव झाला आहे.
Cotton Pest
Cotton Pest Agrowon
Published on
Updated on

Beed News : माजलगाव तालुका परिसरात खरिप हंगामात झालेल्या २७ हजार ११९ हेक्टरवरील कपाशी पिकांवर काळ्या माव्याचा प्रादुर्भाव झाला असून संततधार झालेल्या पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे कपाशीवर परिणाम होत असून कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

मागील चार ते पाच वर्षांपासून सतत भरलेले माजलगाव धरण यावर्षीचा अर्धा पावसाळा संपला तरीही मृतसाठ्यातच आहे. त्यामुळे पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांना उसाचे पिक मोडावे लागले आहे. त्यामुळे खरिपात कापूस, सोयाबीनचे लागवड क्षेत्र वाढले आहे. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ८९ हजार ६९३ हेक्टर असून ७८ हजार ७७८ हेक्टर क्षेत्र खरीप लागवड लायक आहे.

Cotton Pest
Cotton Pest : कपाशी पिकातील गुलाबी बोंड अळी, बोंडसड नियंत्रण

यापैकी साठ हजार ३३२ हेक्टरवर खरीपातील कापूस, सोयाबीन, तीळ, उडीद, मूग, तूर, बाजरी पिकाची पेरणी करण्यात आलेली आहे तर सर्वाधिक सोयाबीनला पसंती देत तीस हजार ४३८ हेक्टरवर सोयाबीन तर २७ हजार ११९ हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आलेली आहे.

दरम्यान, मागील दहा ते पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आणि सततच्या ढगाळ वातावरणामुळे कापूस पिकावर मव्याचा प्रादुर्भाव पहायला मिळत आहे. त्यामुळे उत्पन्नावर परिणाम होणार असल्याने शेतकरी अडचणीत सापडणार आहे.

Cotton Pest
Cotton Cultivation : नगर जिल्ह्यात कापसाची दीड लाख हेक्टर लागवड

शेताला तळ्याचे स्वरूप

मागील पंधरा दिवसांपासून शहरासह तालुका परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कपाशी, सोयाबीन पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसत आहे तर शेताला तळ्याचे स्वरूप आले असून कपाशी, सोयाबीन पिवळे पउत आहे.

मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे कपाशीवर मव्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पिकाची वाढदेखील खुंटली असून सुर्यप्रकाशाअभावी विविध किडींचा प्रादुर्भाव देखील पहायला मिळत आहे. - सुधाकर पठाडे, शेतकरी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com