Ratan Tata Death : उद्योग 'रतन' हरपलं; उद्योगपती रतन टाटांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन

Ratan Tata Maharashtra : महाराष्ट्र सरकारने गुरुवार (ता.१०) राज्यात एक दिवसाचा शासकीय दुखवटा देखील जाहीर केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबद्दल माहिती दिली.
Ratan Tata Death
Ratan Tata Deathagrowon
Published on
Updated on

Ratan Tata Passed Away : भारताच्या उद्योग क्षेत्रातील रत्न समजल्या जाणाऱ्या रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. बुधवारी (ता.०९) रात्री ११ च्या सुमारास मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. रतन टाटा यांचे पार्थिव सध्या त्यांच्या हलेकाय या राहत्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे.

गुरूवारी (ता.१०) सकाळी १० वाजता हलेकाय येथून टाटा यांचे पार्थिव नरीमन पॉईंट येथील एनसीपीए याठिकाणी हलवण्यात आले. त्यानंतर सकाळी १० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत सर्वसामान्य लोकांना एनसीपीए याठिकाणी टाटा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. यावेळी एनसीपीएच्या प्रवेशद्वार क्रमांक ३ मधून लोकांना अंत्यदर्शनासाठी प्रवेश दिला जाईल, तर प्रवेशद्वार क्रमांक २ मधून नागरिकांना दर्शन घेऊन बाहेर पडता असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Ratan Tata Death
Ajit Pawar : कर्ज काढून उसाला एफआरपीपेक्षा जादा दर नको; अजित पवारांकडून साखर कारखानदारांना सूचना

एक दिवसाचा शासकीय दुखवटा

रतन टाटा यांच्या निधनानंतर देशभरातून अनेक मान्यवरांकडून श्रद्धांजली वाहिली जात आहे. दरम्यान याबाबत महाराष्ट्र सरकारने गुरुवार (ता.१०) राज्यात एक दिवसाचा शासकीय दुखवटा देखील जाहीर केला आहे. याबद्दलची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येणार आहे. तसेच, मनोरंजनाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. राज्य शासनाकडून नियोजित कार्यक्रमही रद्द करण्यात आले असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

Ratan Tata Death
Tractor Sale India : भारतात 'या' कंपनीच्या ट्रॅक्टरला शेतकऱ्यांची सर्वाधिक पंसती ; विक्रीतही वाढ

मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

नैतिकता आणि उद्यमशीलता यांचा अपूर्व आणि आदर्श संगम रतन टाटा यांच्या ठायी होता. सुमारे १५० वर्षांची श्रेष्ठत्व आणि सचोटीची परंपरा असलेल्या टाटा समूहाची जबाबदारी यशस्वीरीत्या पेलणारे रतन टाटा हे एक जिवंत आख्यायिका होते. त्यांचा निर्णायक खंबीरपणा आणि मानसिक कणखरपणा टाटा समूहाला वेगळ्या औद्योगिक उंचीवर घेऊन गेला. ते भारताचा अभिमान होते. त्यांना मी आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. रतनजी टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

रतन टाटा यांना गुरूवारी (ता.१०) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत रतन टाटा यांच्यावर शोकप्रस्ताव मांडला. या प्रस्तावात त्यांचे कार्यकर्तृत्व आणि त्यांच्या योगदानाची प्रशंसा करण्यात आली. याबरोबरच, रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आला.

राष्‍ट्रप्रेम, समाजसेवा आणि माणुसकी जपणारा व्यक्ती गेला

महान उद्योजक आणि तेवढेच थोर समाजसेवी रतन टाटा यांच्या जाण्याने अतीव दुःख झाले आहे. उद्योजक म्हणून त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहेच, त्याचवेळी राष्‍ट्रप्रेम, समाजसेवा आणि माणुसकीची मोठी परंपराही आपल्या मागे सोडली आहे. त्यांचे कुटुंबीय, तसेच त्यांचे लक्षावधी चाहते यांच्याबरोबर माझ्या सहवेदना असतील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदरांजली व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com