Tractor Sale India : भारतात 'या' कंपनीच्या ट्रॅक्टरला शेतकऱ्यांची सर्वाधिक पंसती ; विक्रीतही वाढ

Mahesh Gaikwad

शेती व्यवसाय

शेतकऱ्यांसाठी दिवसेंदिवस शेती करणे आतबट्याचा धंदा झाला आहे. त्याला कारणंही तशीच आहेत.

Tractor Sale India | Agrowon

मजुरांची टंचाई

शेतीचा वाढलेला उत्पादन खर्च, मजुरांची टंचाई, शेतीमालाला मिळणारा भाव या सगळ्यांचा मेळ बसवत शेतकरी शेती करतो आहे.

Tractor Sale India | Agrowon

आधुनिक तंत्रज्ञान

बदलत्या काळानुसार शेती क्षेत्रात शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर होत आहे.

Tractor Sale India | Agrowon

पारंपरिक शेती

पारंपरिक शेतीला फाटा देत आता शेतकरीही शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देताना दिसत आहे.

Tractor Sale India | Agrowon

अल्पभूधारक शेतकरी

भारतात सारख्या देशात अल्पभूधारक आणि सीमांत शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. या शेतकऱ्यांना आजही शेतीकामासाठी ट्रॅक्टर खरेदी करण्याची ऐपत नसते.

Tractor Sale India | Agrowon

ट्रॅक्टर मागणी

असे असले तरी भारतात मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरला मागणी आहे. मे २०२४ मध्ये सर्व कंपनींच्या देशांतर्गत ट्रॅक्टरच्या विक्रीमध्ये ०.३६ टक्क्यांची वाढ झाली आहे.

Tractor Sale India | Agrowon

ट्रॅक्टर विक्री

'ट्रॅक्टर जंक्शन' या भारतातील ट्रॅक्टरच्या खेरदी-विक्रीची माहिती देणाऱ्या वेबसाईटनुसार, मे २०२४ या महिन्यात भारतात ८२ हजार ९३४ ट्रॅक्टर्सची विक्री झाली आहे.

Tractor Sale India | Agrowon

महिंद्रा अँड महिंद्रा

गेल्यावर्षी याच कालावधित ८२ हजार ६४० ट्रॅक्टर्स विक्री झाली होती. भारतात सर्वाधिक महिंद्रा अँड महिंद्र कंपनीचे ट्रॅक्टर विक्री झाले आहे.

Tractor Sale India | Agrowon

ट्रॅक्टर कंपनी

मे २०२४ मध्ये महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या ३५ हजार २३७ ट्रॅक्टर्सची विक्री झाली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा भारतातील सर्वात मोठी आणि जुनी ट्रॅक्टर निर्मिती कंपनी आहे.

Tractor Sale India | Agrowon

पहिला ट्रॅक्टर

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने सर्वात पहिला ट्रॅक्टर १९६३ मध्ये बनविला होता. महिंद्रा बी-२७५ असे पहिल्या ट्रॅक्टर मॉडेलचे नाव होते.

Tractor Sale India | Agrowon