Banana Cultivation : खानदेशात केळी लागवड वाढण्याचे संकेत

Banana Market Update : खानदेशात अर्ली कांदेबाग केळी लागवड पूर्ण झाली आहे. यंदा केळी लागवड खानदेशात सुमारे ७५ ते ७६ हजार हेक्टरवर होईल, असे संकेत आहेत.
Banana Farming
Banana FarmingAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात अर्ली कांदेबाग केळी लागवड पूर्ण झाली आहे. यंदा केळी लागवड खानदेशात सुमारे ७५ ते ७६ हजार हेक्टरवर होईल, असे संकेत आहेत. केळीचे दर मध्यंतरी कमी झाले होते. सध्या दर टिकून आहेत. इतर पिकांमध्ये शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागला आहे.

कारण दर कमी अधिक झाले. केळी पीक शेतकऱ्यांना बऱ्यापैकी परवडले. कांदेबाग केळी व मृग बहर केळीचे उत्पादनही बऱ्यापैकी आले. जळगाव जिल्ह्यात मृग बहर केळीची काढणी मार्च अखेरिस सुरू होते. तर कांदेबाग केळीची काढणी दसरा सणापासून सुरू होत असते. सध्या उशिराच्या कांदेबाग केळीची काढणी काही भागात सुरू आहे.

Banana Farming
Banana Export : देशातील केळी निर्यातीची गती कायम

या केळीला किमान १००० व कमाल १६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर सध्या मिळत आहे. मृग बहर केळीची लागवड मे महिन्यात सुरू होते. अर्ली लागवड मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात केली जाते. ही लागवड पूर्ण झाली आहे. नियमित लागवड जूनच्या मध्यापासून सुरू होते. खानदेशात मृग बहर केळीखालील क्षेत्र अधिक असते.

तर कांदेबाग केळीखालील क्षेत्र कमी असते. कांदेबाग केळीची लागवड जळगाव जिल्ह्यातील चोपडा, जळगाव, पाचोरा, जामनेर भागात केली जाते. तर मृग बहर केळीची लागवड जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर, नंदुरबारमधील तळोदा, शहादा भागात केली जाते.

Banana Farming
Banana Seedlings : ‘ईश्वेद’ची ग्रँड ग्रँड नाइन केळी रोपे आफ्रिकन बाजारपेठांत

खानदेशात गेल्या हंगामात मृग बहर केळीची लागवड सुमारे ५० हजार हेक्टरवर झाली होती. यंदा ही लागवड सुमारे ५५ हजार हेक्टरवर होऊ शकते. तर कांदेबाग केळीची लागवडही सुमारे २० हजार हेक्टरवर होईल. जळगाव जिल्ह्यातील एकूण केळी लागवड ६० हजार हेक्टरवर जाईल, अशी स्थिती आहे. या केळीसाठी उतिसंवर्धित रोपांचा उपयोग करीत आहेत. ही रोपे खानदेशात विविध कंपन्यांतर्फे पुरविली जात आहे.

केळी रोपांचे दर स्थिर

केळीचे दर यंदा स्थिर आहेत. यामुळे पुढे जानेवारी आणि मे, जून महिन्यात केळी लागवड वाढेल. यात अनेक शेतकरी केळीच्या उतिसंर्धित रोपांची लागवड करतात. या रोपांचे दरही स्थिर आहेत. अनेक कंपन्या खानदेशात रोपांची विक्री करतात. प्रतिरोप ११, १४, १५ व १७ रुपये असे दर आहेत.

केळी रोपांची लागवड जळगावमधील रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर भागात अधिक केली जाते. तसेच नंदुरबारमधील शहादा, अक्कलकुवा, तळोदा भागातही रोपांची लागवड अधिक असते. शेतकरी केळी रोपांची आगाऊ नोंदणी करीत आहेत. रोपांचा पुरवठा मध्य प्रदेश, गुजरात, पुणे, जळगाव भागांतून अनेक कंपन्या खानदेशात करतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com