Bamboo Park India: देशातील सर्वांत मोठे बांबू उद्यान पर्यटनापुरतेच मर्यादित!

Bamboo Tourism: देशी-विदेशी बांबूच्या तब्बल ७४ प्रजातींचे जतन करणारे देशातील एकमेव बांबू उद्यान अमरावती शहरात आहे. परंतु त्या आधारावर बांबूवरील लघू प्रक्रिया उद्योग उभा राहील, हे केवळ दिवास्वप्नच ठरले आहे.
Bamboo Park
Bamboo ParkAgrowon
Published on
Updated on

Amravati News: देशी-विदेशी बांबूच्या तब्बल ७४ प्रजातींचे जतन करणारे देशातील एकमेव बांबू उद्यान अमरावती शहरात आहे. परंतु त्या आधारावर बांबूवरील लघू प्रक्रिया उद्योग उभा राहील, हे केवळ दिवास्वप्नच ठरले आहे.

पन्नास हेक्टरच्या परिसरात अमरावती शहरालगत वडाळी वनपरिक्षेत्रात बांबूउद्यान विकसित करण्यात आले. तत्कालीन वनपालाने घेतलेली मेहनत आणि त्याला वनाधिकाऱ्यांनी दिलेल्या साथीच्या जोरावर येथे वीस किंवा पंचवीस नव्हे तर देशी, विदेशी बांबूंच्या ७४ प्रजातींचे जतन करण्यात आले आहे. राज्यातील इतरही जिल्ह्यांत बांबूंच्या विविध प्रजातींची रोपे लागवडीसाठी पाठविली जातात.

Bamboo Park
Bamboo Farming : बांबू लागवडीचे नियोजन

प्रारंभीच्या काळात या परिसरात शेतकऱ्यांनी बांबूची अधिकाधिक प्रमाणात लागवड करून त्यापासून भरघोस उत्पादन घ्यावे, याकरिता प्रोत्साहन म्हणून प्रशिक्षणवर्ग येथे होत होते. परंतु बोटावर मोजण्याइतक्याच जणांनी बांबू लागवडीसाठी पुढाकार घेतला. नोव्हेंबर २०१७ पासून वडाळी वनपरिक्षेत्रात बांबू उद्यान पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. त्यातून वनविभागाला आर्थिक उत्पन्न झाले.

बांबूची घरे, त्यापासून निर्मित होणारे दागिने, इतर शोभेच्या वस्तू पर्यटकांना आकर्षित करतात, त्या वस्तू केवळ बघण्यासाठी येथे उपलब्ध आहेत. पर्यटन सुविधेव्यतिरिक्त दुसरा सकारात्मक विचार शासकीय व प्रशासकीय व्यवस्थेला गेल्या सात वर्षांत करता आला नाही.

Bamboo Park
Bamboo Industry Revolution: बांबूमध्ये उद्योगक्रांती घडविण्याची क्षमता

प्रारंभीच्या काळात अनेक जाणकारांना येथे किंवा या प्रकल्पाच्या आसपास मोठा प्रकल्प उभारून अधिक प्रमाणात बांबू उत्पादन होईल, अनेकांना रोजगार मिळेल, असे वाटत होते. ते आता स्वप्नवत वाटायला लागले आहे. केवळ अधूनमधून एखादा कार्यक्रम होत असेल तेवढ्यावरच अधिकाऱ्यांनी समाधान मानले आहे. मेळघाटात बांबू प्रक्रिया उद्योग सुरू आहे. तेवढेच समाधान आहे. बांबू उद्यानातून दर वर्षाला शेतकरी लागवडीसाठी पाच ते दहा हजार रोपे येथून घेऊन जातात. त्यापैकी किती शेतकऱ्यांनी उत्पादनक्षम बांबू लागवड केली, याचा डाटा वनविभागाकडे उपलब्ध नाही.

विविध प्रजातींच्या बांबूचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये असलेला गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न झाल्यास त्याचा सकारात्मक परिणाम भविष्यात दिसेल.
सय्यद सलीम, सेवानिवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी, अमरावती
वडाळी वनपरिक्षेत्रात विकसित करण्यात आलेल्या बांबू उद्यानाचा परिसर नैसर्गिक जंगल म्हणून विकसित झाला आहे. पर्यटनातून जनजागृती सातत्याने सुरू आहे.
धैर्यशील पाटील, उपवनसंरक्षक, प्रादेशिक वनविभाग, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com