Bamboo Plantation : बांबू लागवड, प्रक्रिया उद्योगावर मनभा येथे चर्चासत्र

Nature's Bliss Agri Tourism Centre : बांबू लागवडीतून कार्बन क्रेडिट मिळवणे आणि बांबू चारकोल/कोळसा साऊथ कोरियाला निर्यात करण्याच्या उद्देशाने मनभा (ता. कारंजा, जि. वाशीम ) येथील नेचर्स ब्लिझ कृषी पर्यटन केंद्रात चर्चासत्र पार पडले.
Nature's Bliss Agri Tourism Centre
Nature's Bliss Agri Tourism CentreAgrowon
Published on
Updated on

Akola News : बांबू लागवडीतून कार्बन क्रेडिट मिळवणे आणि बांबू चारकोल/कोळसा साऊथ कोरियाला निर्यात करण्याच्या उद्देशाने मनभा (ता. कारंजा, जि. वाशीम ) येथील नेचर्स ब्लिझ कृषी पर्यटन केंद्रात चर्चासत्र पार पडले.

या कार्यक्रमाला चेन्नईचे येथील अथेना इन्फोनॉनिक्सचे संचालक जय आनंद, कोरियन गुंतवणूकदार तथा उद्योजक हे बाँग चाउंग (सल्लागार, Evo-Nexus कार्बन क्रेडिट लिमिटेड, दक्षिण कोरिया), तसेच भारत बांबू संघटनेचे अध्यक्ष राहुल निळकंठराव देशमुख उपस्थित होते.

Nature's Bliss Agri Tourism Centre
Bamboo Cultivation : बांबू लागवड तंत्रज्ञानाचा अभ्‍यासक्रमात समावेश

कार्बन क्रेडिटमार्फत बांबू लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना अर्थप्राप्ती होत असते. परंतु अशा प्रकल्पासाठी कोट्यवधींची गुंतवणूक लागते. विदर्भातील बांबू लागवड, वापरावर गुंतवणुकीची व्यवहार्यता तपासण्यासाठी हे बॉंग चेओंग यांना देशमुख यांनी विदर्भात आमंत्रित केले. बांबू शेतकऱ्यांना त्यांच्या बांबू लागवडीच्या (संख्या आणि वर्षे) आधारावर आर्थिक फायदा कसा होईल तसेच चाऊंग यांच्या कंपानीतर्फे बांबू कोळसा मशिन्स कशा मिळतील यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.

Nature's Bliss Agri Tourism Centre
Bamboo Cultivation : धाराशिव जिल्ह्यात २५ हजार हेक्टरवर होणार बांबू लागवड

श्री. चाऊंग यांनी सांगितले, की कार्बन क्रेडिट प्रोग्रॅममध्ये आवश्यक ती संपूर्ण गुंतवणूक त्यांच्या कोरियन कंपनीद्वारे केली जाईल. या गुंतवणुकीच्या बदल्यात एकदा कार्बन क्रेडिट्स खरेदीदार कंपनीने विकत घेतल्यानंतर त्यांना त्यांचा हिस्सा मिळेल. तसेच शेतकऱ्यांना सुद्धा यातून पैसे मिळतील.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उंबर्डा बाजारचे सरपंच राज चौधरी, भारत बांबू संघटनेचे संचालक समीर देशमुख, नेचर्स ब्लिझ कृषी पर्यटन केंद्राचे संचालक निळकंठराव देशमुख, लक्ष्मी फाउंडेशनच्या शीतल देशमुख, पवन मिश्रा, नीलेश सोळंके, धीरज काटोले, कपिल शुक्ला यांनी प्रयत्न केले. वाशीमसह यवतमाळ, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांतील शेतकरी उपस्थित होते. राहुल देशमुख यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com