Indian Spces : भारतीय मसाल्यांना जागतिकस्तरावर मागणी

मसाले महामंडळाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दिनेशसिंह बिष्ट यांचे प्रतिपादन
Indian Spices
Indian SpicesAgrowon

यवतमाळ ः ‘‘जमिनीतील गुणधर्मामुळे भारतीय मसाल्यांना वेगळा गंध मिळतो. त्यामुळे भारतीय मसाल्यांना जागतिकस्तरावर मोठी मागणी आहे. परिणामी शेतकऱ्यांनी मसाला पिकांचे उत्पादन आणि प्रक्रिया यावर भर दिल्यास त्यांची आर्थिकस्थिती बदलू शकते,’’ असे प्रतिपादन भारतीय मसाले महामंडळाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दिनेशसिंह बिष्ट यांनी केले. मसाले महामंडळ (भारत) तसेच विडूळ फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्‍त सहकार्याने विडूळ येथे आयोजित हळद लागवड व प्रक्रिया उद्योग तसेच आयात-निर्यात विषयक कार्यशाळेत ते बोलत होते.

Indian Spices
Indian : स्वतः भारतीय म्हणून शाबूत राहू !

कार्यशाळेला जिल्हाधिकारी अमोल येडगे, आमदार नामदेव ससाणे, तंत्र अधिकारी श्रीराम शिरसाठ, मसाले महामंडळाच्या उपसंचालक डॉ.ममता रूपोलिया, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ डॉ. विजय काळे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रशांत नाईक, उमरखेड तालुका कृषी अधिकारी गंगाधर बळवंतकर, तज्ज्ञ डॉ.स्नेहलता भागवत, सचिन माळकर, केव्हीके प्रमुख शिवाजी नेमाडे, सहाय्यक प्राध्यापक अंजली गहरवार, संदीप कोरडे यांची यावेळी उपस्थिती होती. उमरखेड तालुक्‍यातील विडूळ परिसरात मोठ्या प्रमाणावर पानवेलीचे मळे आहेत त्यासोबतच हळद लागवड क्षेत्रही अधिक आहे. या शेतकऱ्यांनी या पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत प्रक्रियेवर भर द्यावा, असे आवाहन यावेळी उपस्थितांनी केले.

सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक प्रशांत गुंढारे, गजानन गांजरे यांनी केले. विडूळ फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक रामेश्‍वर बिचेवर, गजानन गांजरे, प्रामदे दिल्लेवार, सुदर्शन भवरे, अरुण बोन्सले, गजानन मुलंगे, मारोती कोत्तेवार, पांडूरंग घायर, महेश्‍वर बिचेवार, विकास मुलंगे यांची या वेळी
उपस्थिती होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com