Cotton Advisory : आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीची आजपासून बैठक

Cotton Industry : केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीने आजपासून (ता. २) मंगळवारपर्यंत (ता. ५) बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीची ८१ वी बैठक आयोजित करण्यत आली आहे.
Cotton Market
Cotton MarketAgrowon
Published on
Updated on

बाळासाहेब पाटील

Mumbai News: केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीने आजपासून (ता. २) मंगळवारपर्यंत (ता. ५) बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीची ८१ वी बैठक आयोजित करण्यत आली आहे.

केंद्रीय वाणिज्य व उद्योग आणि ग्राहक व्यवहारमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते आज दुपारी दोन वाजता या बैठकीचे उद्‍घाटन होईल. ‘कापूस मूल्यसाखळी : जागतिक समृद्धीसाठी स्थानिक नवोन्मेष’ ही या बैठकीची संकल्पना आहे.

वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालयाने भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय), भारतीय वस्त्रोद्योग महासंघ (सीआयटीआय) आणि भारतीय कापूस संघटनेच्या (सीएआय) सहयोगाने ही बैठक आयोजित केली आहे. आठ वर्षांनंतर ही बैठक होत आहे.

चार दिवस चालणाऱ्या बैठकीत विविध कापूस उत्पादक आणि ग्राहक देश, प्रदेशातील सरकारी प्रतिनिधी, प्रतिष्ठित उद्योगपती, महत्त्वाचे व्यावसायिक प्रतिनिधी, नामवंत शास्त्रज्ञ आणि संशोधक यासह जगभरातील ३५ देशांचे ४०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होतील. कोरोना महामारीनंतर प्रथमच संपूर्ण समितीची ही पहिलीच बैठक आहे.

Cotton Market
Cotton Picking Wages : कापूस वेचणीच्या मजुरीत वाढ सुरूच

‘आयसीएसी’ ही संयुक्त राष्ट्रांची मान्यता असलेली आणि कापसाचा अंतर्भाव असलेली आंतरराष्ट्रीय संस्था आहे. १९३९ मध्ये ‘आयसीएसी’ची स्थापना झाली आणि सध्या यामध्ये २८ सदस्य देशांचा समावेश आहे. भारतासह ब्राझील, इजिप्त, फ्रान्स, सुदान आणि अमेरिका हे या मंचाचे संस्थापक सदस्य आहेत.

याशिवाय, ‘आयसीएसी’चे सदस्य नसलेले इतर देशदेखील बैठकीत सहभागी होत आहेत. नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२२ दरम्यान ८० वी सर्व सदस्यीय बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती. ‘नवोन्मेष आणि नेतृत्वाच्या माध्यमातून शाश्‍वततेला चालना देणे’, ही त्याची संकल्पना होती. गतिमान कापूस अर्थव्यवस्थेसाठी उत्पादकता आणि हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता याबाबत जगभरातील तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.

Cotton Market
Cotton Cultivation : कापसाची दुनिया एकत्र विणताना...

या बैठकीत कापूस उद्योगाशी संबंधित विविध मुद्यांवर चर्चा केली जाईल. उत्पादकता वाढविणारे तंत्रज्ञान, कापूस उत्पादनात आमूलाग्र बदल घडविणारा हवामान-अनुकूल नवोन्मेष, अलीकडील प्रभावी तांत्रिक प्रगती, वस्त्रोद्योग या मुद्यांचा समावेश असेल.

या बैठकीनंतर इच्छुक प्रतिनिधींसाठी ६ ते ८ डिसेंबर दरम्यान अहमदाबाद येथील वस्त्रनगरी आणि नजीकच्या परिसरात तंत्रज्ञान विषयक दौरा आयोजित आयोजित करण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com