Climate Resilient Crops: देशातील अन्नधान्य उत्पादन २०२५-२६ या पीक वर्षात विक्रमी ३७६.५६ दशलक्ष टनांवर पोहोचण्याचा अंदाज केंद्र सरकारने व्यक्त केला आहे. चांगला मॉन्सून, हमीभावातील वाढ आणि हवामान बदलाला तोंड देणाऱ्या सुधारित वाणांचा प्रसार यामुळे उत्पादनात मोठी वाढ झाल्याचा दावा केंद्रीय कृषी विभागाने बुधवारी जाहीर केलेल्या तिसऱ्या आगाऊ अंदाजात केला आहे..मागील वर्षी देशाचे अन्नधान्य उत्पादन ३५७.७३ दशलक्ष टन होते. त्याच्या तुलनेत यंदा सुमारे ५ टक्के वाढ अपेक्षित आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या उच्चांकी उत्पादनाचे श्रेय शेतकरी आणि भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) यांच्या संशोधन कार्याला दिले..Foodgrain Production: देशातील धान्य उत्पादनात १८८ लाख टनांनी वाढ, भात, गहू, मका पीक सर्वाधिक.गहू उत्पादनात विक्रमी वाढ२०२५-२६ मध्ये गव्हाचे उत्पादन उच्चांकी १२.०६ कोटी टनांवर जाण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी हे उत्पादन ११.७९ कोटी टन होते. पूर्वमोसमी पाऊस आणि गारपिटीमुळे काही भागांत नुकसान झाले असले, तरी देशातील एकूण गहू उत्पादन स्थिर आणि मजबूत राहिल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे..तांदूळ, मका उत्पादनात वाढतांदूळ उत्पादन यंदा १५.४० कोटी टनांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी ते १५.०२ कोटी टन होते. भरडधान्यांचे उत्पादन ७.४४ कोटी टनांवर जाण्याची शक्यता आहे. त्यामध्ये मक्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढून ५.५० कोटी टनांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी मक्याचे उत्पादन ४.३४ कोटी टन होते..Massive Seed Production: ग्रामबीजोत्पादनातून २९ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध.कडधान्यांबाबत मिश्र चित्रतूर उत्पादन किंचित घटून ३५.९ लाख टन राहण्याची शक्यता आहे. मागील वर्षी ते ३६.२ लाख टन होते. मात्र हरभरा उत्पादनात वाढ होऊन ते १.२५ कोटी टनांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. मसूर उत्पादन १७.६ लाख टनांवर स्थिर राहण्याची शक्यता आहे..मोहरी तेजीत; सोयाबीनमध्ये घटएकूण तेलबिया उत्पादन ४.३० कोटी टनांवर जाण्याचा अंदाज आहे. भुईमूग उत्पादन १.३० कोटी टनांवर पोहोचू शकते. मात्र सोयाबीन उत्पादन घटून १.२५ कोटी टनांवर येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मागील वर्षी सोयाबीन उत्पादन १.५२ कोटी टन होते. दुसरीकडे मोहरीउत्पादन वाढून १.३७ कोटी टनांवर जाण्याची शक्यता आहे..ऊस उत्पादनात मोठी झेपव्यावसायिक पिकांमध्ये ऊस उत्पादनात मोठी वाढ नोंदवली गेली आहे. यंदा ऊस उत्पादन ५००.०६ दशलक्ष टनांवर पोहोचण्याचा अंदाज असून, मागील वर्षी ते ४५४.६१ दशलक्ष टन होते. कापूस उत्पादन मात्र किंचित घटून ते २.९० कोटी गाठी राहण्याची शक्यता आहे. मागील वर्षी ते २.९७ कोटी गाठी होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.