Indian Economy : भारत तिसऱ्या सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थेच्या वाटेवर

President Draupadi Murmu : अठराव्या लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (ता. १) सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेत प्रवेश करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित केले.
President Draupadi Murmu
Draupadi MurmuAgrowon
Published on
Updated on

New Delhi News : ‘‘मोदी सरकार तिप्पट वेगाने काम करीत आहे. पंतप्रधान मोदींच्या राजवटीत भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश बनला आहे,’’ असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन्ही सभागृहांना संबोधित करताना मोदी सरकारच्या कार्यकाळाचे कौतुक केले.

अठराव्या लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (ता. १) सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेत प्रवेश करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित केले. तसेच पंतप्रधान द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांना संबोधित केले. त्या वेळी त्या बोलत होत्या.

राष्ट्रपतींनी ५९ मिनिटांचे केलेल्या भाषणात सुरुवातीला महाकुंभातील चेंगराचेंगरी आणि त्यात झालेल्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. त्या म्हणाल्या, की गंगेच्या तीरावर असलेल्या पवित्र भूमीवर अशा अपघाताने दुःख झाले. शोकाकुल कुटुंबांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करते.

President Draupadi Murmu
Budget 2025 : राष्ट्रपतींच्या अभिभाषणात सरकारच्या योजनांचं कौतुक

राष्ट्रपती मुर्मू यांनी आपल्या अभिभाषणात केंद्र सरकारच्या विविध योजनांचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, की मोदी सरकारने कृषी पायाभूत सुविधा निधी वाढवला. राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान सुरू केले. भरड धान्य खरेदी करण्यासाठी तीन पट पैसे खर्च केले. शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनासाठी १०९ जाती देण्यात आल्या. खरीप आणि रब्बी पिकांसाठी वाढवलेले एमएसपी शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव मिळावा आणि त्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

त्या पुढे बोलताना म्हणाल्या, की देशात इलेक्ट्रिक बसेस धावत आहेत. १५ रोप-वे प्रकल्प सुरू आहेत. दिल्ली-एनसीआरमध्ये मेट्रो सेवा २०१४ मध्ये सुरू झाली. २०० किलोमीटर क्षेत्रात सुरू झालेले नेटवर्क आज दुप्पट झाले आहे. १० वर्षांत विमानतळांची संख्या दुप्पट झाली आहे.

मोदी सरकारने नारी शक्ती वंदन कायदा लागू करून लोकसभा आणि विधानसभेत महिलांना आरक्षण दिले. १० कोटींहून अधिक महिलांसाठी ९ लाख कोटी रुपये वाटप करण्यात आले. मोदी सरकारचे लक्ष्य ३ कोटी लखपती दीदी तयार करण्याचे आहे, जे लवकरच पूर्ण केले जाईल. १.१५ कोटींहून अधिक लखपती दीदी सक्रिय आहेत.

President Draupadi Murmu
Union Budget 2025 : अर्थसंकल्पातून मिळावा उद्योगाला दिलासा

आयुष्मान योजनेचा लाभ ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना होत आहे. बँकांकडून कर्ज मर्यादा दुप्पट केल्याने लहान व्यावसायिकांना फायदा झाला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचा विस्तार करून, मोदी सरकार लवकरच ३ कोटी नवीन घरे वाटप करण्याचे लक्ष साध्य करेल, असेही त्या म्हणाल्या.

विविध योजना यशस्वी

मोदी सरकारने ग्राम सडक योजनेसाठी २६ हजार कोटी रुपये वाटप केले आहेत. ६ महिन्यांत १७ वंदे भारत गाड्या देशाला समर्पित. सरकारने कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग स्थापन केला. लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना ५० टक्के पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला. १.७५ लाख आयुष्यमान आरोग्य मंदिरे बांधण्यात आली आहेत. मोदी सरकारने आधुनिक इंटरनेट आणि डिजिटलायझेशनच्या जगात एक पाऊल टाकले. यूपीआय प्रणाली आणि कामकाजातील बदलांचा सामान्य लोकांना फायदा झाला. देशात पाच लाखांहून अधिक वाणिज्य सेवा केंद्रे कार्यरत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com